• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

बहिणाई स्मृति संग्रहालयात ‘बहिणाईंचे भावविश्व’ कार्यक्रम उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 24, 2026
in जळगाव जिल्हा
0
माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

जळगाव, (प्रतिनिधी) : कान्हदेशच्या मातीचा गंध, कष्टकरी जीवनाचे वास्तव, निसर्ग आणि माणसाच्या जगण्याचे तत्त्वज्ञान आपल्या सहज, बोलीभाषेतील कवितेतून मांडणाऱ्या लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचे चिंतन करणारा ‘बहिणाईंचे भावविश्व’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. बहिणाबाई चौधरी यांच्या १४६व्या जयंतीनिमित्त बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध लेखक, कवि व नाटककार किरण येले, अध्यक्ष म्हणून विठ्ठल मंदिर संस्थानचे विलास हरी चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, अशोक चौधरी, कवि अशोक कोतवाल, सुभाष मराठे, विजय जैन, देवेंद्र पाटील, मू. जे. महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख विद्या व्यवहारे, प्रा. डॉ. योगेश महाले, विलास धनवे, डॉ. पुरुषोत्तम महाजन, प्रा. वर्षा उपाध्ये, का. ऊ. कोल्हे विद्यालयाचे प्राचार्य व्ही. आर. कोल्हे, जी. बी. पवार, चित्रा नारखेडे, मनिषा चौधरी, किशोर जाधव, चित्रकार विजय मोहन भाटिया, विशाखा देशमुख, हर्षल पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. चौधरी परिवारातील सदस्य शोभा, वैशाली, निलिमा, लक्ष्मी, सुनंदा, किरण चौधरी, श्रीधर चौधरी, दिलीप चौधरी यांच्यासह कार्यक्रमाला साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला ‘माह्यी माय सरसोती’ ही सामूहिक कविता मू.जे. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. त्याचबरोबर रूपाली माळी (माझी मुक्ताई), प्राची शेरे (अरे संसार संसार) या विद्यार्थिनींनी बहिणाबाईंच्या काव्यरचना सादर केल्या. उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

कवी किरण येले यांनी बहिणाईंचे भावविश्व यावेळी उलगडून दाखविले. बहिणाबाईंच्या साहित्याचा संत कबीर आणि संत तुकाराम यांच्या विचारपरंपरेशी संबंध जोडत, “बहिणाबाई केवळ स्त्री कवयित्री नव्हत्या; त्या समाजाचे वाचन करणाऱ्या संवेदनशील साहित्यिक होत्या. माणूस हा केंद्रबिंदू ठेवून निर्माण झालेले साहित्यच चिरंतन राहते,” असे त्यांनी प्रतिपादन केले. बहिणाबाईंच्या साहित्याचा अनुभव सांगताना संग्रहालयात आल्यावर “मंदिरात आल्याचे समाधान”व्यक्त केले.

गिरीष कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात कान्हादेशच्या साहित्य-संस्कृतीचे जतन, बहिणाबाईंच्या साहित्याचे निरंतर जागरण आणि त्यांचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे, या उद्देशाने ‘बहिणाईंचे भावविश्व’ आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. तसेच बहिणाई आणि महात्मा गांधी यांच्या भेटीचे वर्णन सांगितले. यशस्वितेसाठी सुनील तायडे, ज्ञानेश्वर सोनार, प्रदीप पाटील, शरद धनगर, समाधान महाजन, अमोल भोलाणकर, विवेक व हितेंद्र चौधरी यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले. प्रा. गोपीचंद धनगर यांनी सूत्रसंचालन केले. गिरीष कुलकर्णी यांनी आभार मानले.


 

Next Post
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न
जळगाव जिल्हा

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न

October 20, 2026
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
आरोग्य

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा
खान्देश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add