• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एमपीडीए : सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्याची येरवडा कारागृहात रवानगी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 15, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
एमपीडीए : सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्याची येरवडा कारागृहात रवानगी

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाया अधिक तीव्र केल्या आहेत. या अंतर्गत जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्या रहीम शेख (वय २१, रा. नुरानी मशीदजवळ, गेंदालाल मिल, जळगाव) याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ (MPDA) अधिनियमांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

तन्वीर ऊर्फ तन्या याच्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला, दुखापत करणे, दंगा, घरफोडी आणि आर्म्स ॲक्ट यांसारखे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०२२ ते २०२६ या काळात त्याच्यावर हद्दपारीसह विविध प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी आदेश जारी करून (आदेश क्र. दंडप्र/कावि/एमपीडीए/०४/२०२६) त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार, १४ ऑगस्ट रोजीच पोलीस पथकाने तन्वीर शेख याला ताब्यात घेऊन येरवडा मध्यवर्ती कारागृहात दाखल केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक सागर शिंपी आणि सपोनि सुरेश आव्हाड व पथकाने केली. सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.


 

Next Post
समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय — पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय — पालकमंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add