• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत सावता महाराजांची पुण्यतिथी : अयोध्या नगरात भव्य दिंडी, १०१ वृक्षारोपण..!

भक्तिमय वातावरणात सोहळा उत्साहात संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 11, 2026
in जळगाव जिल्हा
0
संत सावता महाराजांची पुण्यतिथी : अयोध्या नगरात भव्य दिंडी, १०१ वृक्षारोपण..!

जळगाव, (प्रतिनिधी) : महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था (माळी समाज), अयोध्या नगर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिंडी सोहळा आणि १०१ वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात व भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे प्रमुख संतोष इंगळे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, “संत सावता माळी महाराजांनी ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ या अभंगातून शेतात राबतानाच परमेश्वराचा शोध घेण्याचा आणि निसर्गाशी नातं जोडण्याचा संदेश दिला. हा विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी आम्ही या पुण्यतिथीचे औचित्य साधून १०१ वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे.

या दिंडी सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून जळगावच्या महापौर दीपमाला काळे उपस्थित होत्या. सोहळ्याबद्दल बोलताना महापौर काळे म्हणाल्या, “संत सावता महाराजांचे जीवन आणि त्यांचे विचार हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहेत. धार्मिक कार्यक्रमासोबतच समाजोपयोगी उपक्रम राबवून १०१ वृक्षारोपण करण्याचा महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे पर्यावरणाला मोठी मदत होईल, असे ते म्हणाले.

या सोहळ्यास स्थायी समिती सदस्य डॉ. चंद्रशेखर पाटील, स्थायी समिती सदस्य वंदना संतोष इंगळे, नगरसेविका रंजना वानखेडे, डॉ. वीरेन खडके, सुनील खडके, स्वीकृत नगरसेवक नरेंद्र सोनवणे, हर्षल मावळे, प्रदीप रोटे, संस्थेचे प्रमुख संतोष इंगळे, नंदू पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक वसंत महाजन यांचे हस्ते सावता माळी महाराज यांचे पूजन करण्यात आले. पवित्र दिंडी संतोष इंगळे यांच्या घरापासून रेमंड कॉलनी, अयोध्यानगर परिसरात भक्तिमय वातावरणात निघून कासार मंगल कार्यालयापर्यंत पोहोचली. दिंडीत सहभागी झालेल्या भाविकांनी संत सावता महाराजांच्या विचारांना व कार्याला वंदन केले. हभप भागवत देशमुख महाराज यांनी संत सावता महाराज यांच्या समाज प्रबोधन, श्रमप्रतिष्ठा, भक्ती आणि सेवाभावाच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकार्य करावे असे आवाहन केले.

पुण्यतिथी सोहळ्यासाठी सुभाष माळी, प्रमोद थोरात, गोपाळ महाजन, जयंत इंगळे, वामन महाजन, हर्षल इंगळे, हेमंत महाजन, कमलेश महाजन, संकेत चौधरी, संदेश महाजन, पवन इंगळे आदींनी परिश्रम घेतले. माळी समाजातील बंधू-भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Next Post
रोजगार मेळाव्यात तरुणांना सुवर्ण संधी; ४५ उमेदवारांची झाली निवड

रोजगार मेळाव्यात तरुणांना सुवर्ण संधी; ४५ उमेदवारांची झाली निवड

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add