• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

बालवारकऱ्यांची दिंडी, संत वेशभूषा स्पर्धा संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील बालरंगभूमी परिषदेच्या जिल्हा शाखेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालयात बालवारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष वंदन वाणी, सचिव गोवर्धन पाटील, संचालक डॉ.विरल वाणी, बालरंगभूमी परिषद, जळगाव शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, नेहा पवार-गुजराथी, कोषाध्यक्ष सचिन महाजन, बालरंगभूमी परिषदेचे ज्ञानेश्वर सोनवणे, मोहित पाटील, संतोष चौधरी, अवधूत दलाल, मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी व ज्योती बिऱ्हाडे उपस्थित होते.

सुरुवातीला संतांच्या प्रतिमा व पालखी पूजन केल्यानंतर राजरत्न पारधे या विद्यार्थ्याने केलेले अभंग गायन आणि शाळेतील शिक्षिकांनी सादर केलेल्या अभंगाने भक्तीमय वातावरण निर्मिती झाली.

विवेकानंद नगर व परिसरातून बालवारकऱ्यांच्या दिंडीने परिसरातील राहिवाश्यांचे लक्ष वेधून घेतले. दिंडी मार्गावर नागरिकांनी स्वागतासाठी रांगोळ्या काढून सुशोभीकरण केले होते. ठिकठिकाणी दिंडी पूजन करण्यात आले. नागरिकांनी व पालकांनी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिंडीचे शाळेत शेवटी आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत राजगिरा लाडू प्रसाद स्वरुपात देऊन दिंडी व उपक्रमाची सांगता झाली.

संत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन..
वारकरी संप्रदायातील संतांच्या शिकवणींची बालकांना माहिती व्हावी व त्यांची महती त्यांच्यापर्यंत पोहचावी या हेतूने बालरंगभूमी परिषदेतर्फे संत वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्राथमिक गटातून निवांशी चव्हाण (सर्वोत्कृष्ट), स्वरा यशोद (उत्कृष्ट), पार्थ बोरसे (उत्तम) तसेच माध्यमिक गटातून हेमंत पाटील (सर्वोत्कृष्ट), दर्शना जगताप (उत्कृष्ट), भाग्यश्री पवार (उत्तम) यांनी पटकाविले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून नेहा पवार व सचिन महाजन यांनी काम पाहिले. यानंतर विद्यार्थ्यांनी भक्त पुंडलिक ही नाटिका सादर केली. शालेय संत व वारकरी वेशभूषेत मैदानावर गोलाकार रिंगणात पावली खेळत भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याची सांगता झाली. योगेश शुक्ल व विनोद ढगे यांनी विद्यार्थ्यांना बालरंगभूमी परिषदेच्या कार्य व उपक्रमांविषयी उपस्थितांना माहिती दिली. उपक्रमाचे नियोजन श्रीकांत पाटील व सूत्रसंचालन राजेंद्र पवार यांनी केले.

Next Post
वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव

वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव

ताज्या बातम्या

‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना
जळगाव जिल्हा

‘बोलावा विठ्ठल’ मध्ये चिमुकल्यांचा रंगला रिंगण सोहळा; भक्तिगीतांतून विठ्ठलाची आराधना

July 27, 2026
वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव
जळगाव जिल्हा

वंजारी युवा संघटनेतर्फे जळगावात २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिमाखात संपन्न; ११० विद्यार्थ्यांचा गौरव

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
शैक्षणिक

आषाढी एकादशीनिमित्त पालखी, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष
जळगाव जिल्हा

आषाढी एकादशीनिमित्त गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये भक्तिमय जल्लोष

July 25, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात
जळगाव जिल्हा

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add