• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५७ लाखांच्या गुटखा तस्करीसह ५ आरोपी जेरबंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 11, 2026
in गुन्हे
0
चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई; ६.५७ लाखांच्या गुटखा तस्करीसह ५ आरोपी जेरबंद

​चाळीसगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध तस्करीविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५ आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्याकडून गुटखा, सुगंधित पानमसाला आणि वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ६ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचा हा एक भाग आहे. ​चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेल हे अवैध धंद्यांची गोपनीय माहिती संकलित करत असताना, त्यांना ८ जुलै २०२६ रोजी खात्रीशीर माहिती मिळाली.

चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी परिसर, बलभीम व्यायामशाळेजवळ, आनंदवाडी येथील जुन्या डिझेल गॅरेजसमोर आणि बसस्थानकाच्या मागील लक्ष्मीनगर परिसरात काही जण प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री व वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचून पाच आरोपींना ताब्यात घेतले. यात अजित चांदूमल रावलानी, कुबेर शेख कसम, हितेश किशोर पवार, निखिल राजेंद्र केसरवाणी आणि सौरभ संजय शिंगणे (सर्व रा. चाळीसगाव) यांचा समावेश आहे.

​आरोपींच्या ताब्यातील ट्रॅव्हल बॅगची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी तातडीने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून पंचनामा केला. अन्न प्रशासन अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत गुटख्यासह वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

​प्राथमिक तपासात हा प्रतिबंधित माल मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून तस्करी करून चाळीसगाव येथे आणल्याचे उघड झाले असून, पोलीस या रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध घेत आहेत. ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पो.कॉ. मोहन सूर्यवंशी, अशोक मोरे, कल्पेश पगारे यांच्या पथकाने केली.

दरम्यान, नागरिकांनी अशा कोणत्याही अवैध व्यवसायाची माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.


 

Next Post
नेत्रदीपक यश! खान्देश, विदर्भ आणि संभाजीनगरात ६१,२२९ मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक टप्पा

नेत्रदीपक यश! खान्देश, विदर्भ आणि संभाजीनगरात ६१,२२९ मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक टप्पा

ताज्या बातम्या

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
आरोग्य

वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात; मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 25, 2026
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव जिल्हा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

August 25, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add