• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चोपड्यात आंतरजिल्हा टोळी जेरबंद; गावठी कट्टा, मॅगझिनसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा पोलिसांची धडक कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 3, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
चोपड्यात आंतरजिल्हा टोळी जेरबंद; गावठी कट्टा, मॅगझिनसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला असून, बेकायदेशीर हत्यारांची वाहतूक करणाऱ्या ३ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा (पिस्तूल), दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली एक कार असा एकूण सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) आणि चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

​मिळालेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांना गोपनीय बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली होती. काही संशयित इसम एका कारमधून विनापरवाना गावठी कट्टा घेऊन लासूर-चुंचाळे मार्ग धरून चोपडा शहराकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खात्री पटताच स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे एक संयुक्त पथक तात्काळ तयार करण्यात आले.

​या पथकाने चोपडा-लासूर-चुंचाळे रोडवरील शनिमंदिर परिसरात सापळा रचला. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयास्पद वाटणारी एक चारचाकी वाहन (क्र. MH 20 EE-6103) पथकाने अडवली. पंचांसमक्ष या कारची कसून झडती घेतली असता, कारच्या मागील सीटखाली एक गावठी कट्टा (पिस्तूल), मॅगझिनसह आणि एक अतिरिक्त मॅगझिन मिळून आले. तसेच कारमधील संशयित आरोपींच्या अंगझडतीत तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ सर्व मुद्देमाल जप्त करत आरोपींना ताब्यात घेतले.

​अटक करण्यात आलेले आरोपी:
१) ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (वय ३९ वर्षे, रा. कुऱ्हाड खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव), २) सचिन रोशन पवार (वय ३४ वर्षे, रा. मयूर पार्क कॉलनी, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), ३) अनिल कचरे साळुंखे (वय ३७ वर्षे, रा. जाधव गल्ली, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)

या कारवाईत पोलिसांनी ६० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व मॅगझिन, १० हजार रुपयांचे अतिरिक्त मॅगझिन, ५ लाख रुपये किमतीची कार आणि ३० हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल फोन असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चोपडा शहर पोलीस करीत आहेत.

​सदरची उल्लेखनीय कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोहेकॉ दीपक माळी, रविंद्र पाटील, विष्णू बिऱ्हाडे, पोकॉ रावसाहेब पाटील तसेच चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सपोनि एकनाथ भिसे, युवराज वाळुंज, पोकॉ राजेंद्र कोळी, योगेश पाटील, रजनीकांत भास्कर आणि समा तडवी यांच्या पथकाने बजावली.


 

Tags: chopdaCrimeJalgaonPolice
Next Post
कापूस पिकात पाणी बचतीचे धडे; सेवा फाउंडेशनच्या ४८ गावांतील महिलांना प्रशिक्षण

कापूस पिकात पाणी बचतीचे धडे; सेवा फाउंडेशनच्या ४८ गावांतील महिलांना प्रशिक्षण

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
जळगाव जिल्हा

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

August 24, 2026
माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले
जळगाव जिल्हा

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add