• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शास्त्रीय उप-शास्त्रीय गायनासह कोकण कन्या बॅंडचा बालगंधर्वत धमाल

बालगंधर्व संगीत महोत्सव-2023 ची घोषणा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 9, 2022
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
शास्त्रीय उप-शास्त्रीय गायनासह कोकण कन्या बॅंडचा बालगंधर्वत धमाल

जळगाव, दि.9 – मुंबईच्या स्निती मिश्रा यांनी शास्त्रीय गायन – शास्त्रीय संगीतासह भारतीय अभिजात संगीत सादर केले. कोकण कन्या बँन्डने सूफी, गझल, जुनी हिंदी चित्रपट गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. कलावंतांच्या अफलातुल स्वरांनी बालगंधर्व महोत्सवाचा मंच आज बहरुन गेला.

स्निती मिश्रा यांनी ‘हर हर हर महादेव महेशश्वर.. ‘मालकंस या रागात निबध्द गीत सादर केले यात रसिक महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाले. छोटा ख्याल सादर केले. बोल होते ‘कोयलिया बोले..’ प्रसिध्द गायीका स्व.किशोरीताई अमोणकर यांचा मराठी अभंग ‘हे शाम सुंदर राज असा मनमोहना..’ हे रूपक तालामध्ये सादर केले. त्रितालमध्ये पं. वसंतराव देशपांडे गाऊन अजरामर केलेले ‘घेई छंद मकरंद.. ‘ हे नाट्यगीत सादर केले. स्निता मिश्रा यांनी त्यांचे दादा गुरू पंडित बलवंतराव भट यांचे ‘होली होली खेलत नंदलाल’ राग आडानामध्ये सादर केले.

अडाणा रागामधील तरणा ‘कान्हा दे रे’ सादर करून समारोप केला. स्निता मिश्रासोबत यशवंत वैषणची तबला साथ व मिलिंद कुलकर्णी यांची संवादिनी साथ रसिकांना मोहिनी घातली.
यंदाच्या बालगंधर्व महोत्सवाचे आकर्षण असलेल्या मुंबई येथील कोकण कन्या बॅंड संगितकार रविराज कोलथरकर, आरती सत्यपाल, अरूंधती तेंडुलकर, रसिका बोरकर, स्नेहा आयरे, निकिता घाटे, साक्षी मराठे व विशाल सुतार यांनी काव्य किरणांची प्रभात रंगवली. पंचतुंड ही पारंपारिक नांदी वेगळ्या ढंगात सादर केली.

यानंतर ‘हा झेंडा कुणा गावाचा’ रसिक श्रोत्यांच्या मनावर अक्षरशः बिंबली. ‘आज जाने की जिद ना करो,’ ‘लग जा गले’ या हिंदी सिनेगितांसह अभंगांची मेलडीने जळगावकर रसिकांना आनंदभुती करून दिली. यानंतर ‘जिव रंगला जिव दंगला’या सिनेगीतासह भावगीत मेलडीने रसिकांवर अधिराज्य गाजविले. नाट्यगित व लक्ष्मीकांत बेर्डे लावणी मेलडी रसिकांना मोहीत करून गेली. विरसावरकरांचे ‘ने मजसी ने.. परत मातृभुमीला’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने बालगंधर्व महोत्सवाच्या समारोप झाला.

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, तसेच संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे बालगंधर्व महोत्सवाला प्रायोजकत्व लाभले असुन आजच्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधिक्षक डाॕ. प्रविण मुंडे, जळगाव जनता बँक चे सीईओ पुंडलिक पाटील, संचालक कृष्णा कामटे, पश्चिम क्षेत्र केंद्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर चे शशांक दंडे, जैन इरिगेशनच्यावतीने विजय महोरील, अनिल जोशी, विश्वप्रसाद भट, इंडियन आॕईलचे प्रतिनीधी सौ.किरण शिंदे, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, भारतीय जीवन विमा कंपनीचे चंद्रशेखर आगरकर, डाॕ.अर्पणा भट, दिपक चांदोरकर, दिपीका चांदोरकर यांच्यासह कलावंताची उपस्थिती होती. मैफिलचे सादरीकरण करणाऱ्या कलावंताचे प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. गणेशवंदना मयुर पाटील यांनी सादर केली. वरूण देशपांडे यांनी आभार मानले.

बालगंधर्व संगीत महोत्सव-2023 ची घोषणा
स्व.वसंतराव स्मृती प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या सांगीतिक बालगंधर्व महोत्सव दि. 6, 7 व 8 जानेवारी 2023 ची महत्त्वपूर्ण घोषणा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दिपक चांदोरकर यांनी केली.


 

Next Post
भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे सुरू

भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वे सुरू

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group