• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव शहर 100% लसीकरण करणार.. – महापौर जयश्री महाजन

ॲड.बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 8, 2022
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
जळगाव शहर 100% लसीकरण करणार.. – महापौर जयश्री महाजन

जळगाव, दि. 08 – ॲड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात शनिवारी वय वर्ष 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोवीड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. दरम्यान महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले.

लसीकरण शिबीराचे उद्घाटन जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी शहराचे 100% लसीकरण करण्याचा मानस बोलून दाखवला आणि त्या दृष्टीने शहरातील प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण केले जाईल असेही त्यांनी सांगीतले. विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत आणि कोरोनाला न घाबरता त्याचा प्रसार होणार नाही यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल लोहार यांनी महाविद्यालयाने दुस-यांदा लसीकरणाचा उपक्रम राबविल्याचे सांगीतले. लसीकरणा सोबतच कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत असे सर्वांना आवाहन केले. लसीरकण शिबराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, प्राचार्य डॉ.अनिल लोहार, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष यशवंत चौधरी तसेच मनपा आरोग्य विभागाच्या जयश्री धोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचलन डॉ. के.व्ही. पाटील यांनी केले. महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी इरफान पिंजारी तसेच प्रा.आर.पी.सोनवणे, प्रा.मनोज सोनवणे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. लसीकरण शिबिरात महाविद्यालयाच्या 185 विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.


 

Next Post
बालगंधर्व महोत्सवात धृपद अंतर नादाने रसिक भारावले..

बालगंधर्व महोत्सवात धृपद अंतर नादाने रसिक भारावले..

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add