जळगांव, दि. 07 – तालुक्यातील कुसुंबा येथे शुक्रवार पासून १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी लसीकरण केंद्राची मागणी केली होती.
दरम्यान आरोग्य विभागाने मागणी लक्षात घेत, गावातील श्री.स्वामी समर्थ विद्यालयात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून दिली. त्यामुळे गावातील मुला-मुलींना लस घेणे अधिक सोपे झाले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, प्रा.भाऊसाहेब सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ.संजय चव्हाण, डाॅ. इरेश पाटील, डॉ.चेतन अग्निहोत्री, डाॅ. विकास जोशी, डाॅ.जयश्री सोनार, डाॅ.सुषमा महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली भदाणे, प्रा.हेमंत सोनार, प्रा.सुनील ढाकणे सर्व आशाताई, चालक राजाराम पाचपांडे आदींनी परीश्रम घेतले. आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेवुन १५ ते १८ वयोगटातील मुलां,मुलींना लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.