• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 11, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने व जैन स्पोर्टस अकॅडमीच्या सहकार्यातून स्व. डॉ. घनश्याम कोचुरे यांच्या जयंती निमित्तीने जिल्हा मानांकन स्पर्धा दि. ९ ते १० मे दरम्यान कांताई सभागृह येथे घेण्यात आली. दोन दिवस चालेल्या या स्पर्धेत ४५ च्यावर खेळाडूंनी सहभाग घेतला. आठ खेळाडूंनी क्वार्टर फायनलमध्ये पोहचवले होते. त्यातून जैन इरिगेशनचा आंतराष्ट्रीय कॅरमपटू योगेश धोंगडे चॅम्पियन ठरला. त्याने रईस शेखचा २५-१२, १६-१९, २१-१५ असा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले.

विजेत्यांना तब्बल १५ हजारांची रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ. घनश्याम कोचुरे मेडिकल फाऊंडेशनचे पराग कोचुरे, जैन स्पोर्टस अकॅडमीचे अरविंद देशपांडे, हबीब इंजीनियर, सैयद मोहसिन, आसिफ शेख उपस्थित होते. पराग कोचुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कॅरम खेळाडूंसाठी जैन स्पोर्टस अकॅडमीने उपलब्ध करुन दिलेले व्यासपीठ खूप मोलाचे आहे. यातून चांगले खेळाडू घडत असून उत्कृष्ट खेळ बघायला मिळाला. यावेळी अरविंद देशपांडे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जैन स्पोर्टस अकॅडमी नेहमी अग्रेसर असल्याचे सांगितले.

दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी ॲड. रेखा कोचुरे, तेजस कोचुरे, मंजूर खान यांच्या मान्यवर उपस्थित होते. उपांत्यपूर्व फेरी मध्ये योगेश धोंगडे विरूद्ध अफजल शेख, अयाज शेख विरूद्ध अय्युब खान, नईम अन्सारी विरूद्ध फिरोज खान, मुस्तूफा खान विरूद्ध रईस शेख असे सामने झालेत. उपांत्य फेरीमध्ये योगेश धोंगडे विरूद्ध अयुब खान, रईस शेख विरुद्ध फिरोज खान यांच्या सामना रंगला. फायनल ही योगेश धोंगडे व रईस शेख यांच्यात झाली. यशस्वी झालेल्यांचे कौतूक जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राधेशाम कोगटा, व सरकार्यवाह नितिन बरडे यांच्यासह मान्यवरांनी केले.


 

Next Post
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ‘इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी’ सुरू; मुंबई-पुण्याला जाण्याची गरज नाही

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक 'इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी' सुरू; मुंबई-पुण्याला जाण्याची गरज नाही

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add