• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

पुण्याला होणार राज्यस्तरीय स्पर्धा; निवड खेळांडूंना चषक देऊन गौरव

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 11, 2026
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील आठ व ७ वर्ष वयोगटातील दोन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १९ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा १५ ते १७ मे २०२६ दरम्यान पुणे येथे होणार आहे. तर सात वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा ३० ते ३१ मे २०२६ ला पुणे येथे होतील.

या स्पर्धांसाठी १९ वर्षाआतील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत मुलांमध्ये जळगावचा तसीन तडवी तर मुलींमध्ये पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे प्रथम, तर ७ वर्ष आतील गटात पाचोर्‍याचा विहान वाघ प्रथम देव वेद द्वितीय यांची निवड झाली आहे. विजेत्यांचे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया व पदाधिकाऱ्यांनी कौतूक केले.

मुलांच्या गटातून तसीन रफिक तडवी, कुशान ज्ञानदेव चौधरी, पियुष माळी, जामनेरचा उदय पाटील तर मुलींच्या गटातून पाचोराची ऋतुजा बालपांडे, स्वरा वाघ, जळगावची हर्षदा पाटील, पालवी गणेश माळी, यांनी राज्यस्तरीय फेरीत प्रवेश मिळवला. तर सात वर्षे वयोगटात पाचोर्‍याचा विहान वाघ, देव वेद यांची निवड झाली. अश्वतसिंग राजपूत भुसावल, ज्ञानदा मनोरे चोपडा यांना उत्तेजनार्थ पारतोषिक देण्यात आले. कांताई सभागृहात येथे झालेल्या निवड चाचणीत सहा फेऱ्यांमधून जिल्ह्यातील एकूण ४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रत्येकी चार मुलं व चार मुलींची निवड करण्यात आली. तर सात वर्षे वयोगटात दोन मुले यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध वयोगटांतील विजेत्यांना चषक व मेडल देऊन गौरविण्यात आले. तर तर उत्तेजनार्थ रुद्रांश चेतन तायडे, दुर्वेश कोळी, द्रोणा जामले, श्री शर्मा, भावेश सोनार, कार्तिक कासार, गौरव बारी, चिन्मय मगर, अभंग सोनवणे यांना मेडल देऊन गौरवण्यात आले. पारितोषिक वितरण जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सय्यद मोहसिन, किशोरसिंह शिसोदिया, जैन इरिगेशन मिडीया विभागाचे देवेंद्र पाटील, बुद्धिबळ प्रशिक्षक परेश देशपांडे, प्रमुख पंच प्रवीण ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले.

 


 

Tags: #jalgaon_city#sports
Next Post
महादेव हॉस्पिटलमध्ये ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ कार्यान्वित

महादेव हॉस्पिटलमध्ये 'महात्मा फुले जनआरोग्य योजना' कार्यान्वित

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add