• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘ऑनलाईन राष्ट्रीय चित्रकला’ व ‘आंतरराष्ट्रीय पोस्टर स्पर्धेचे’ आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 4, 2022
in जळगाव जिल्हा, राज्य, राष्ट्रीय
0
‘ऑनलाईन राष्ट्रीय चित्रकला’ व ‘आंतरराष्ट्रीय पोस्टर स्पर्धेचे’ आयोजन

जळगाव, दि. 04 – 30 जानेवारी रोजी महात्मा गांधीजींच्या 74 व्या पुण्यतिथिनिमित्त जळगाव येथील गांधी रिसर्च फाउण्डेशनतर्फे ‘राष्ट्रीय चित्रकला’ स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय पोस्टर स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. जनमानसात सर्जनशील दृष्टिकोणातून कला निर्माण करणे आणि महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित चिरंतन समज अंमलात आणण्याच्या उद्देशाने सदरील चित्रकला आणि पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले.

महात्मा गांधीजींच्या वरील संकल्पना सार्थक करण्याकरिता गांधी रिसर्च फाउण्डेशनतर्फे दर वर्षी विविध स्पर्धा घेण्यात येतात. याच श्रृंखलेत येत्या 30 जानेवारी रोजी महात्मा गांधीच्या 74 व्या पुण्यतिथीनिमित्त ऑनलाईन राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय पोस्टर स्पर्धा आयोजित केली आहे. दोन्ही स्पर्धांकरिता  ‘क्रिएटीव गांधी’, ‘कोरोना ने शिकवले’, ‘ग्रीन अर्थ- ग्रीन लाईफ’ असे विषय देण्यात आलेले आहेत.  प्रथम गट – इयत्ता  ५ वी ते ८ वी, द्वितीय गट – ९ वी ते १२वी आणि तृतीय गट – महाविद्यालयीन तथा खुला गट  असणार आहे. सहभागी होण्याकरिता २० जानेवारीपर्यंत http://www.gandhifoundation.net/GRF_PTG2022/  या लिंकवर नोंदणी करून चित्र / पोस्टर पाठवायची आहेत.

चित्रकला स्पर्धेप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विषय आहेत. पोस्टर स्पर्धेच्या प्रथम गटात ललित कला तसेच इतर महाविद्यालयीन विद्यार्थी भाग घेऊ शकतात आणि व्यावसायिक तथा खुला गट अशा दोन गटात स्पर्धक सहभागी होऊ शकतात.  प्राप्त झालेल्या चित्र/ पोस्टर्समधून परीक्षण समितीद्वारे प्रथम चरणकरिता चित्र व पोस्टर सोशल मिडिया वर अपलोड केले जातील. त्यास मिळालेल्या लाईक्स आणि परीक्षक समितीच्या निर्णयाच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ भरघोस पुरस्कार दिले जातील.

चित्रकला स्पर्धेसाठी प्रथम ११ हजार रूपयांचे तर आंतरराष्ट्रीय पोस्टर स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार ३१ हजार रूपयांचा असेल. तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जातील. विजेत्यांची घोषणा ३० जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात केली जाईल. सदरील स्पर्धा नि:शुल्क आहे. अधिक माहितीकरिता गांधी रिसर्च फाउण्डेशच्या वेबसाईला भेंट द्यावी, असे आवाहन गांधी रिसर्च फाउण्डेशनतर्फे करण्यात आले आहे.

Next Post
सात्री गावाच्या नशिबी वर्षानुवर्षे नरकयातना ! VIDEO

सात्री गावाच्या नशिबी वर्षानुवर्षे नरकयातना ! VIDEO

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group