• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; जिल्हापेठ पोलिसांकडून एक मोटारसायकल जप्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 28, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; जिल्हापेठ पोलिसांकडून एक मोटारसायकल जप्त

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असतानाच, जिल्हापेठ पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तपास चक्र फिरवून दोन सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीची एक होंडा ड्रीम मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. ​जळगाव नवीन बसस्थानक परिसरातून एक मोटारसायकल चोरीला गेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये २० जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.


​​जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयित आरोपी आकाश राजू खरे (रा. नांद्रा ता. पाचोरा, ह.मु. पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि आकाश प्रकाश भिल (रा. कासमपुरा, ता. पाचोरा) या दोघांना ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

​पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता, आरोपींनी जळगाव शहरातील भाजे गल्ली येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीची होंडा कंपनीची ‘ड्रिम’ मोटारसायकल (एम एच १९ डीए ५०११) जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार महेंद्र पाटील करीत आहेत.

​सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, पोलीस कर्मचारी महेश महाजन, महेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, तुषार पाटील, विशाल साळुंखे, गोविंद साबळे आणि जयेश मोरे यांचा सहभाग होता.


 

Tags: #motorcycleCrimeJalgaonPolice
Next Post
जळगाव क्रिकेट लीगचा बिगुल वाजला! फ्रँचायझी आणि आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन उत्साहात संपन्न

जळगाव क्रिकेट लीगचा बिगुल वाजला! फ्रँचायझी आणि आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add