• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात शिवजयंतीचा उत्साह; शिवकॉलनीत छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीचे होणार अनावरण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 17, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात शिवजयंतीचा उत्साह; शिवकॉलनीत छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीचे होणार अनावरण

​जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, यानिमित्ताने एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. “शिवराय मना-मनात, शिवजयंती घराघरात” या संकल्पनेतून येत्या १९ फेब्रुवारी रोजी, सायंकाळी ७ वाजता प्रभाग ७ मधील शिवकॉलनी स्टॉप परिसरात महाराजांच्या एका भव्य-दिव्य प्रतिकृतीचा अनावरण व दर्शन सोहळा पार पडणार आहे.

​या मंगलप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, महापौर दिपमाला काळे, महापालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा प्रभागातील नगरसेवक विशाल भोळे, नगरसेविका अंकिता पाटील आणि नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिवरायांचे जाज्वल्य विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आणि घराघरात पोहोचावेत, या उदात्त उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात महाराजांच्या आकर्षक प्रतिकृतीचे विधीवत पूजन केले जाणार असून, ही प्रतिकृती शिवप्रेमींसाठी मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

​या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते पंकज सुरेश पाटील तथा शिवनेरी ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी सर्व जळगावकर नागरिकांनी आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
​

Next Post
लीनेस क्लब जळगावचा सामाजिक उपक्रम: आवार येथील ‘वाचन कट्ट्या’ला शालेय साहित्याची मदत

लीनेस क्लब जळगावचा सामाजिक उपक्रम: आवार येथील 'वाचन कट्ट्या'ला शालेय साहित्याची मदत

ताज्या बातम्या

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
जळगाव पंचायत समितीत खा. स्मिता वाघ यांच्याकडून योजनांचा आढावा; कामात गती आणण्याचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव पंचायत समितीत खा. स्मिता वाघ यांच्याकडून योजनांचा आढावा; कामात गती आणण्याचे निर्देश

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group