• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्राचार्यांच्या मारहाणीमुळे फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये उलघडले कारण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 16, 2026
in जळगाव जिल्हा
0
प्राचार्यांच्या मारहाणीमुळे फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये उलघडले कारण

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी श्याम प्रभाकर पाटील (वय १९) याने नैराश्यातून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी नेहरू नगर येथील त्याच्या राहत्या खोलीत घडली. प्राचार्यांनी सर्वांसमोर केलेल्या मारहाणीमुळे अपमानित वाटल्याने श्यामने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या खिशात सापडलेल्या ‘सुसाईड नोट’ वरून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्राचार्य योगेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

​मूळचा बोदवड (ता. मुक्ताईनगर) येथील रहिवासी असलेला श्याम जळगावमध्ये राहून शिक्षण घेत होता. रविवारी दि. १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास, रूमवर कोणीही नसताना त्याने गळफास घेतला. त्याचा रूममेट सुट्टीमुळे गावी गेलेला होता. बराच वेळ संपर्क न झाल्याने ही घटना उघडकीस आली.

​सुसाईड नोटमधील हृदयद्रावक वास्तव..
​श्यामच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीने सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणले. त्यात त्याने नमूद केले की:
​मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या श्यामलाच प्राचार्यांनी पीव्हीसी पाईपने सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण केली.
​”गुरु मारतात हे माहित आहे, पण इतकं नाही मारत,” असे त्याने चिठ्ठीत वेदनेने लिहिले आहे.
​यापूर्वीही त्याला काही मुलांनी मारहाण केली होती, मात्र त्यावेळी प्राचार्यांनी दाद न देता उलट श्यामलाच शिवीगाळ केली होती.
​”माझी स्टोरी इन्स्टावर टाक जो,” अशी शेवटची विनंती त्याने आपल्या मित्राला (रामू) केली आहे.

​पालकांचा आक्रमक पवित्रा..
​जोपर्यंत दोषी प्राचार्यांवर गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांना अटक होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा श्यामच्या पालकांनी घेतला होता. अखेर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.

​या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि शिक्षकांच्या वर्तणुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
जळगाव मनपा स्थायीवर अनुभवाचा ‘कस’; महायुतीचा दबदबा, १६ सदस्यांची निवड!

जळगाव मनपा स्थायीवर अनुभवाचा 'कस'; महायुतीचा दबदबा, १६ सदस्यांची निवड!

ताज्या बातम्या

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
जळगाव पंचायत समितीत खा. स्मिता वाघ यांच्याकडून योजनांचा आढावा; कामात गती आणण्याचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव पंचायत समितीत खा. स्मिता वाघ यांच्याकडून योजनांचा आढावा; कामात गती आणण्याचे निर्देश

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group