• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाचोरा कृषी कार्यालयात एसीबीची कारवाई; ५ हजारांची लाच स्वीकारताना तिघांना ठोकल्या बेड्या!

सबसिडीचे अनुदान मंजूर करण्यासाठी मागितली होती लाच; उप कृषी अधीक्षकासह केंद्र संचालक जाळ्यात

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 3, 2026
in कृषी, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पाचोरा कृषी कार्यालयात एसीबीची कारवाई; ५ हजारांची लाच स्वीकारताना तिघांना ठोकल्या बेड्या!

​जळगाव, (प्रतिनिधी) : शेती साहित्यावरील सबसिडीचे अनुदान मिळवून देण्यासाठी ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या पाचोरा येथील उप कृषी अधिकाऱ्यासह दोन खासगी इसमांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी, २ फेब्रुवारी रोजी यशस्वी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

यात लिलाधर शिवाजीराव देशमुख (उप कृषी अधिकारी, वर्ग-३, पाचोरा),  संजय प्रभाकर पाटील (मालक, धनदाई कृषी केंद्र, आंबेवडगाव), नितीन इंदलसिंग निकम (मदतनीस) यांच्या ही कारवाई करण्यात आली आहे.

​आंबेवडगाव (ता. पाचोरा) येथील एका शेतकऱ्याने शासकीय योजनेअंतर्गत नांगर आणि रोटर खरेदी केले होते. या साहित्याचे अनुदान (सबसिडी) मिळवण्यासाठी त्यांनी पाचोरा कृषी कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज केला होता. साहित्याचे फोटो काढून ते पोर्टलवर अपलोड करणे आणि अनुदान मंजूर करण्याच्या बदल्यात उप कृषी अधिकारी लिलाधर देशमुख यांनी ६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ५ हजार रुपये देण्याचे ठरले.

​देशमुख यांनी लाचेची रक्कम आंबेवडगाव येथील धनदाई कृषी केंद्राचे मालक संजय पाटील यांच्याकडे देण्यास सांगितली होती. तक्रारदार शेतकऱ्याने याप्रकरणी जळगाव एसीबीकडे धाव घेतली. सोमवारी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता लाचेची मागणी सिद्ध झाली. संजय पाटील दुकानावर नसल्याने, त्यांच्या सांगण्यावरून दुकानातील मदतनीस नितीन निकम याने ५ हजार रुपये स्वीकारले. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

Tags: CrimeJalgaonकृषी
Next Post
भावी महापौर दीपमाला काळेंचा सायकलवारीने आरोग्य संदेश; सायकलिस्ट ग्रुपतर्फे पद्मालयला स्वागत

भावी महापौर दीपमाला काळेंचा सायकलवारीने आरोग्य संदेश; सायकलिस्ट ग्रुपतर्फे पद्मालयला स्वागत

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group