• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 30, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

​जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा यंदा जळगाव जिल्ह्यात हायटेक देखरेखीखाली पार पडणार आहेत. जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबवण्यासाठी ड्रोन कॅमेरे, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि भरारी पथकांचा कडा पहारा असणार आहे. विशेष म्हणजे, गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध आता थेट अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचा कडक निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

​जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

​यंदाची आकडेवारी : १ लाख ७ हजार विद्यार्थी मैदानात..
​इयत्ता १२ वी: १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ (४८,२३२ विद्यार्थी / ८२ केंद्रे)
​इयत्ता १० वी: २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ (५९,४२० विद्यार्थी / १४७ केंद्रे)

​असे असेल कडक ‘वॉच’..
​ड्रोन आणि व्हिडीओ चित्रीकरण: संवेदनशील आणि उपद्रवी परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे आकाशातून नजर ठेवली जाईल. केंद्राबाहेरील हालचालींचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. प्रत्येक वर्गातील पर्यवेक्षक झूम मीटिंगद्वारे जिल्हा नियंत्रण कक्षाशी जोडले जातील. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट वर्गावर नजर ठेवता येईल. नाशिक विभागीय मंडळाची ९ पथके आणि जिल्हास्तरीय विशेष पथके कोणत्याही क्षणी केंद्रांना भेटी देतील. तसेच परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत पूर्णपणे बंद राहतील.

​वीजपुरवठा आणि पोलीस बंदोबस्त..
​परीक्षा काळात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणला अखंडित वीजपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बाह्य उपद्रव रोखण्यासाठी केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात असेल.
​

Tags: #educational#jalgaon_city
Next Post
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले 'इस्रो'च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

ताज्या बातम्या

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक
गुन्हे

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

March 18, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त
गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त

March 18, 2026
कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group