• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धक्कादायक : ​किरकोळ वादातून ३२ वर्षीय तरुणाची  हत्या

आव्हाणे येथील घटना; गावात शोककळा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 23, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
धक्कादायक : ​किरकोळ वादातून ३२ वर्षीय तरुणाची  हत्या

​जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील आव्हाणे गावात गुरुवारी रात्री एका क्षुल्लक वादाचे पर्यावसान भीषण हत्येत झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. किरकोळ बाचाबाचीनंतर झालेल्या धक्काबुक्कीत गंभीर दुखापत झाल्याने सागर अरुण बिऱ्हाडे (वय ३२) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे येथील जुन्या मारुती मंदिर परिसरात गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सागर बिऱ्हाडे आणि एका संशयित व्यक्तीमध्ये कोणत्यातरी कारणावरून शाब्दिक चकमक झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने सागरला जोराने ढकलून दिले. या धक्क्यामुळे सागर जमिनीवर कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

​रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली..
​सागरला ग्रामस्थांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

​कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
​मृत सागर बिऱ्हाडे हा कुटुंबातील कर्ता पुरुष होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार आहे. ऐन तरुण वयात सागरचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले असून संपूर्ण आव्हाणे गावावर शोककळा पसरली आहे.

​पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू..
​घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सध्या पोलीस फरार आरोपीच्या मागावर असून, किरकोळ वादाचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड

गर्जना पत्रकार संघाची जळगावात बैठक; उत्तर महाराष्ट्रसह जिल्हा कार्यकारिणीची होणार निवड

ताज्या बातम्या

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add