• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव: प्रभाग १३ ‘ब’ मध्ये भाजपची ताकद वाढली; अपक्ष उमेदवार प्रियंका तायडे यांचा सुरेखा तायडे यांना पाठिंबा

आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सोपविले पाठिंब्याचे पत्र

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 3, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगाव: प्रभाग १३ ‘ब’ मध्ये भाजपची ताकद वाढली; अपक्ष उमेदवार प्रियंका तायडे यांचा सुरेखा तायडे यांना पाठिंबा

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १३ ‘ब’ मध्ये राजकीय समीकरणे बदलली आहेत. या प्रभागातील अपक्ष उमेदवार प्रियंका विनोद तायडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुरेखा नितीन तायडे यांना आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. या निर्णयामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, सुरेखा तायडे यांची बाजू अधिक भक्कम झाली आहे.

​आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत प्रियंका तायडे यांनी पाठिंब्याचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. सुरेखा तायडे यांचा प्रदीर्घ सामाजिक कार्याचा अनुभव, नागरिकांच्या समस्या सोडवण्याची त्यांची तत्परता आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली त्यांची सकारात्मक दृष्टी पाहून हा निर्णय घेतल्याचे प्रियंका तायडे यांनी पत्रात नमूद केले आहे.

​विकासासाठी एकत्र येण्याचा निर्धार..
यावेळी बोलताना आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, “भाजपच्या विकासकामांवर विश्वास ठेवून अपक्ष उमेदवारांनी दिलेला हा पाठिंबा विजयाचा मार्ग सुकर करणारा आहे.” या पाठिंब्यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये भाजपच्या बाजूने सकारात्मक संदेश गेला आहे.

​याप्रसंगी प्रभाग १३ ‘अ’ चे उमेदवार नितीन सपके, प्रफुल देवकर, विनोद तायडे, विशाल देवकर, अजित राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपक्ष उमेदवाराने माघार घेत पाठिंबा दिल्याने आता प्रभाग १३ ‘ब’ मध्ये भाजपचे पारडे जड मानले जात आहे.


 

Tags: #jalgaon_city#politicalBjp
Next Post
जळगाव मनपा रणसंग्राम: महायुती आज प्रचाराचे ‘रणशिंग’ फुंकणार; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती

जळगाव मनपा रणसंग्राम: महायुती आज प्रचाराचे 'रणशिंग' फुंकणार; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रमुख उपस्थिती

ताज्या बातम्या

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप
जळगाव जिल्हा

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप

November 7, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
आरोग्य

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड
जळगाव जिल्हा

शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड

November 6, 2026
जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव जिल्हा

जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

November 6, 2026
जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
खान्देश

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add