• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोलाणी मार्केटमध्ये झालेल्या हल्ल्यातील महाविद्यालयीन तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 31, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गोलाणी मार्केटमध्ये झालेल्या हल्ल्यातील महाविद्यालयीन तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रक्ताळलेला थरार पाहायला मिळाला. जुन्या वादाचा राग मनात धरून एका २५ वर्षीय तरुणाने १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार केले. दुर्दैवाने, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

साई गणेश बोराडे (वय १८, रा. शंकरराव नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. साई हा देवकर महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेत होता. संशयित आरोपी शुभम रवींद्र सोनवणे (२५, रा. चौगुले प्लॉट, जळगाव) याच्याशी त्याचे जुने वाद होते. बुधवारी सकाळी देखील त्यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. याचाच बदला घेण्याच्या हेतूने शुभमने हे टोकाचे पाऊल उचलले.
​
दुपारी २ वाजेच्या सुमारास साई बोराडे हा गोलाणी मार्केट परिसरात आला असताना, संशयित आरोपी शुभमने त्याला गाठले. काही कळण्याच्या आतच संतापलेल्या शुभमने जवळ असलेला चाकू काढून साईच्या शरीरावर वर्मी घाव घातले.

​​उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली..
जखमी साईला नागरिकांच्या मदतीने तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र जखमा खोल असल्याने त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सागर शिंपी यांनी पथकासह घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी आता ‘खुनाचा’ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

​

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
जळगाव मनपा रणसंग्राम : भाजपच्या उज्वला बेंडाळे प्रभाग १२ मधून बिनविरोध

जळगाव मनपा रणसंग्राम : भाजपच्या उज्वला बेंडाळे प्रभाग १२ मधून बिनविरोध

ताज्या बातम्या

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

August 30, 2026
गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !
जळगाव जिल्हा

गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन !

August 30, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

कडमळू येथे घरफोडी; १ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!
जळगाव जिल्हा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add