• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात कुंटणखान्यावर छापा; योगेश्वर नगरातील प्रकार, दोन महिलांची सुटका

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 30, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात कुंटणखान्यावर छापा; योगेश्वर नगरातील प्रकार, दोन महिलांची सुटका

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात भाड्याच्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शनिपेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. योगेश्वर नगर परिसरात सोमवारी झालेल्या या कारवाईत देहविक्री करणाऱ्या दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालविणाऱ्या मुख्य संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

​योगेश्वर नगर भागातील एका भाड्याच्या घरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी एक ‘डमी’ ग्राहक (पंटर) तयार केला. या पंटरने कुंटणखाना चालविणाऱ्याशी संपर्क साधला असता १५०० रुपयांत सौदा निश्चित झाला. पंटर घराच्या आत गेल्यानंतर त्याने पूर्वनियोजित संकेतानुसार पोलीस पथकाला मोबाईलवर ‘मिस कॉल’ देऊन इशारा केला.

​इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने घराला चारही बाजूंनी घेराव घालून छापा टाकला. यावेळी पोलिसांनी कुंटणखाना चालविणाऱ्या मालकाला ताब्यात घेत दोन पीडित महिलांची सुटका केली. भरवस्तीत अशा प्रकारे अवैध व्यवसाय सुरू असल्याने परिसरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त होते. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

​ही धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रवींद्र मोतीराया, आवेश शेख, अमोल ठाकूर, प्रणय पवार आणि महिला पोलीस कर्मचारी स्मिता पाटील यांच्या पथकाने केली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
​

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
जळगाव मनपा निवडणुक: दिग्गज बाद, नव्या चेहऱ्यांना संधी! तर निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर

जळगाव मनपा निवडणुक: दिग्गज बाद, नव्या चेहऱ्यांना संधी! तर निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group