• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एरंडोल : नगराध्यक्षपदी डॉ. नरेंद्र ठाकूर यांचा ९२९४ मतांनी दणदणीत विजय; शिंदे सेनेचे नगरसेवक पदावर वर्चस्व

एरंडोल पालिकेवर 'महायुती'चा झेंडा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 22, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
एरंडोल : नगराध्यक्षपदी डॉ. नरेंद्र ठाकूर यांचा ९२९४ मतांनी दणदणीत विजय; शिंदे सेनेचे नगरसेवक पदावर वर्चस्व

​एरंडोल, (प्रतिनिधी) : येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर यांनी ९२९४ मताधिक्य मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत ठाकूर दाम्पत्याने विजयाची मोहोर उमटवली असून डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या पत्नी डॉ. गीतांजली ठाकूर या देखील प्रभाग क्रमांक २ ‘अ’ मधून नगरसेवक पदासाठी विजयी झाल्या आहेत.

​शिंदे सेनेचे नगरसेवक पदावर वर्चस्व..
नगराध्यक्षपद भाजपकडे गेले असले तरी, नगरसेवक पदांच्या शर्यतीत शिंदे सेना पक्षाने बाजी मारली आहे. नगरपालिकेतील २३ जागांपैकी शहराच्या विविध प्रभागांतून शिंदे सेनेचे ११, भाजपचे ४ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३ उमेदवार निवडून आल्याने नगरपालिकेत शिवसेना पक्षाचे स्पष्ट वर्चस्व दिसून येत आहे. या निकालाचा थेट परिणाम आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

​मतमोजणी आणि निकाल..
म्हसावद रस्त्यावरील इनडोअर स्टेडियममध्ये २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप पाटील आणि मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात आली. सर्व निकाल जाहीर होताच स्टेडियमबाहेर समर्थकांनी एकच गर्दी केली होती.

​विजयाचा जल्लोष आणि बंदोबस्त..
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
​

Tags: #politicalBjperandolShivsena
Next Post
माजी विद्यार्थ्यांकडून संत ज्ञानेश्वर विद्यालयाला दोन टीव्ही संच भेट

माजी विद्यार्थ्यांकडून संत ज्ञानेश्वर विद्यालयाला दोन टीव्ही संच भेट

ताज्या बातम्या

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा
गुन्हे

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add