• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कौशल्याचा आविष्कार; जळगावात ‘एड्युफेअर-२०२५’चे थाटात उद्घाटन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 20, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांचा उत्साह आणि कौशल्याचा आविष्कार; जळगावात ‘एड्युफेअर-२०२५’चे थाटात उद्घाटन

जळगाव, (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ‘मनोरंजनातून शिक्षण’ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. अनुभूती स्कूलने आयोजित केलेला ‘एड्युफेअर’ हा उपक्रम मुलांचे भविष्य घडवणारा असून, यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होत आहे, असे प्रतिपादन कोगटा इम्पोर्ट एक्सपोर्टचे अध्यक्ष प्रेम कोगटा यांनी केले. ​खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित ‘एड्युफेअर–२०२५’ या तीन दिवसीय शैक्षणिक व मनोरंजनात्मक महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १९) थाटात संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.

​याप्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष अनिश शहा, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी, अंबिका जैन, अनिल जोशी, रूपाली वाघ, मनोज दाडकर, अरविंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी आकाशात फुगे सोडून या उपक्रमाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले.

​​उद्योजक अनिश शहा यांनी एड्युफेअरचे कौतुक करताना सांगितले की, “देशाचे भविष्य विद्यार्थ्यांमध्ये दडलेले आहे. सायन्स, गणित, इंजिनिअरिंग किंवा इतिहास यांसारखे कठीण विषय मुले खेळता खेळता शिकत आहेत. अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जाणारा हा उपक्रम जळगावकरांसाठी एक मोठी पर्वणी आहे.”

​शून्य ते ९९ वयोगटासाठी खेळांची मेजवानी..
​अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी आवाहन केले की, “पालकांनी मुलांच्या उत्साहाला दाद देण्यासाठी आवर्जून यावे. येथे शून्य ते ९९ वर्षे वयोगटातील कोणीही खेळू शकेल असे खेळ आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने याचा आनंद घ्यावा.”

​‘एड्युफेअर-२०२५’ ची प्रमुख वैशिष्ट्ये:
​▪️बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि भाषिक कौशल्यांवर आधारित विविध खेळ.
​▪️इतिहासातील रोमन संस्कृतीचा जिवंत अनुभव देणारे प्रकल्प.
​▪️अवघड प्रयोग आणि गणिते सोप्या पद्धतीने मांडणारी मॉडेल्स.
▪️विद्यार्थी आणि पालकांनी मिळून थाटलेली विविध खाद्यपदार्थांची दुकाने.
​▪️पपेट शो, संगीत-नृत्य सादरीकरण, ६०० पेक्षा अधिक हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन.
​▪️रणपा बैलगाडी सवारी, आरशांची दुनिया आणि ॲडव्हेंचर झोन.
​एड्युफेअर, मेळावा २१ डिसेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ४:०० ते रात्री ८:३० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे.

Tags: #anubhuti#jalgaon_city
Next Post
जळगाव जिल्ह्यातील स्थगिती मिळालेल्या ६ पालिकांतील ९ प्रभागांसाठी आज मतदान; रविवारी निकाल

जळगाव जिल्ह्यातील स्थगिती मिळालेल्या ६ पालिकांतील ९ प्रभागांसाठी आज मतदान; रविवारी निकाल

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group