• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

यावल-शेळगाव बॅरेज रस्त्यावरील थरार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 3, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

​यावल, (प्रतिनिधी) : इंस्टाग्रामवर शिवीगाळ करणारा व्हिडिओ बनवल्याच्या जुन्या वादातून यावल-शेळगाव बॅरेज रस्त्यावर एका १८ वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना २ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली आहे. तुषार चंद्रकांत तायडे (वय १८, रा. समता नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जिल्हा रुग्णालयात तुषारच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला.

​इंस्टाग्रामवरील व्हिडिओ ठरला कारण..
मयत तुषार तायडे याने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शिवीगाळ करणारा व्हिडिओ बनवला होता. याच व्हिडिओचा राग मनात ठेवून संशयित आरोपींनी त्याला अडवून बेदम मारहाण केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. तुषार तायडे हा यावल तालुक्यातील परसाडे येथील नातेवाइकाच्या अंत्यविधीवरून मित्राच्या दुचाकीवरून जळगावकडे परतत होता. याच वेळी यावल–बोरावल मार्गावरील पाण्याच्या पाटाजवळील शेळगाव बॅरेज रस्त्यावर संशयितांनी त्याचा रस्ता अडवला. राहुल शांताराम सोनवणे, विक्रम पंडित सोनवणे (दोघेही रा. जळगाव) आणि त्यांच्यासोबत असलेले इतर सहा ते सात अनोळखी व्यक्तींनी मिळून तुषारला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केली.

​उपचारादरम्यान मृत्यू..
मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या तुषारला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, ३ डिसेंबरच्या मध्यरात्री तुषारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

​खुनाचा गुन्हा दाखल..
या प्रकरणी मृत तुषारचे वडील चंद्रकांत तायडे यांनी यावल पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे आणि इतर अनोळखी संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यावल पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
​

Tags: CrimePoliceYawal
Next Post
घरकुल हप्त्यासाठी १०,००० रुपयांची मागितली लाच

घरकुल हप्त्यासाठी १०,००० रुपयांची मागितली लाच

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add