• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भाजप-शिवसेना महायुतीचे एरंडोलमध्ये ‘शक्तिप्रदर्शन’! आ. अमोल पाटलांचा विरोधकांवर ‘विकास’ अस्त्राने प्रहार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 28, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
भाजप-शिवसेना महायुतीचे एरंडोलमध्ये ‘शक्तिप्रदर्शन’! आ. अमोल पाटलांचा विरोधकांवर ‘विकास’ अस्त्राने प्रहार

​एरंडोल, (प्रतिनिधी) : एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीने शहरात आपली ताकद दाखवून दिली. ​या प्रचार रॅली मध्ये आमदार अमोलदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याप्रसंगी त्यांनी विकास कामांचा पाढा वाचत विरोधकांवर सडकून टीका केली.

महायुतीचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार डॉ. नरेंद्र धुडकु ठाकुर यांच्यासह प्रभाग क्र. २ अ च्या उमेदवार डॉ. गीतांजली नरेंद्र ठाकुर, प्रभाग क्र. २ अ चे उमेदवार प्रमोद राजेंद्र महाजन, प्रभाग क्र. ७ ब चे उमेदवार जोहरी सागर प्रकाश मोतीवाले, प्रभाग क्र. ११ अ च्या उमेदवार मालती अमोल वाणी, प्रभाग क्र. ११ ब च्या उमेदवार मंजुळाबाई नथ्थु चौधरी, आणि प्रभाग क्र. ११ क चे उमेदवार संजय सुरेश पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली आणि कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

​विकासकामांवर भर आणि विरोधकांवर टीका..
​आमदार अमोलदादा पाटील यांनी याप्रसंगी एरंडोल शहरातील जनतेला महायुतीचे उमेदवार बहुमतांनी विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. शहराच्या वैभवात भर घालणारी अनेक कामे सुरू असून, नागरी सुविधांची पाणी पुरवठा योजना आणि भुयारी गटार योजना यांसारखी मूलभूत सुविधांची कामे देखील शहरात प्रगतीपथावर आहेत, असे त्यांनी नमूद केले. “या विकासकामांमुळे आणि या निवडणुकीनंतर एरंडोलच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन आमच्याकडे आहे,” असे ते ठामपणे म्हणाले.
​
विरोधकांवर सडकून टीका करताना आमदार पाटील म्हणाले की, या नगरपरिषद निवडणुकीत विरोधकांना प्रत्येक जागेवर उमेदवार देण्यासाठी पक्षाचे ‘ए.बी. फॉर्म’ घेऊन भटकंती करावी लागली आणि उमेदवारांच्या विनवण्या कराव्या लागल्या. “गेल्या वेळच्या निवडणुकांप्रमाणेच विरोधक भुलथापा देऊन निवडणुका जिंकण्याची स्वप्ने पाहत आहेत. परंतु, आता ही माय-बाप जनता सुजाण झाली आहे,” असे ते म्हणाले.

​”आपलं शहर, आपलं प्रभाग, आपलं वॉर्ड हे कोण विकसित करू शकतो, आपल्या सुख-दुःखात कोण येऊ शकतो, यासह अन्य बाबींचा विचार करूनच ही माय-बाप जनता शुभाशीर्वाद देते,” असे सांगून त्यांनी एरंडोल शहराच्या विकासासाठी दूरदृष्टी असलेल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना साथ देण्याची विनंती केली.

​या प्रचार रॅली आणि सभेसाठी धरणगाव बाजार समितीचे माजी सभापती शालिक गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजु चौधरी, विठ्ठल आंधळे, किशोर निंबाळकर, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक चिंतामण पाटील, डॉ. एन.डी. ठाकुर, भाजप नेते अनिल टोळकर यांसह एरंडोल महायुतीचे व स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि असंख्य शहरवासीय उपस्थित होते. महायुतीने प्रचाराच्या या पहिल्या टप्प्यातच जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.


 

Tags: #politicalBjperandolShivsena
Next Post
जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात हाणामारी: हॉटेल व्यवहारातून व्यापाऱ्याला जबर मारहाण!

जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात हाणामारी: हॉटेल व्यवहारातून व्यापाऱ्याला जबर मारहाण!

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add