• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेर शहरासाठी ‘स्वच्छ’ नेतृत्वाची गरज: माजी आ. शिरीष चौधरी यांचे मत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 23, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
अमळनेर शहरासाठी ‘स्वच्छ’ नेतृत्वाची गरज: माजी आ. शिरीष चौधरी यांचे मत

अमळनेर, (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षीत बाविस्कर यांच्या बाजूने जोरदार प्रचार केला आहे. अमळनेर ही संतांची भूमी असून, या शहराला चारित्र्यसंपन्न, अभ्यासू आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

​चौधरी यांनी नमूद केले की, डॉ. परीक्षीत बाविस्कर हे उच्चशिक्षित, मूळचे अमळनेरकर असून त्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आहे. ​विरोधक त्यांच्या जळगाव येथील वास्तव्याबद्दल उपस्थित करत असलेले प्रश्न दिशाभूल करणारे आहेत. कारण, आमदारांच्या पत्नीसुद्धा याच प्रभागात डॉ. बाविस्कर यांच्या कुटुंबाकडून मते मागत आहेत. ​डॉ. बाविस्कर हे नम्र आणि जनतेशी जोडलेले व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या कुटुंबाचा समाजकार्यातील ठसा अमळनेरमध्ये सर्वश्रुत आहे.

​’लचका तोडणारा’ नगराध्यक्ष नको..
​माजी आमदार चौधरी यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची जबाबदारी स्पष्ट करताना म्हटले की, नगराध्यक्ष हा २४ तास लोकांसाठी उपलब्ध असणारा, शहराचे प्रश्न समजून घेणारा आणि विकासाला दिशा देणारा असावा. नगरपालिका हे जनतेची सेवा करण्याचे पवित्र व्यासपीठ आहे, जनतेची लूट, कुटनीती, भ्रष्ट व्यवहार आणि स्वार्थी उद्योग करण्याचे नाही. ​यावेळी, त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या प्रामाणिकतेवर आणि २४ तासांच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. विरोधात असलेल्या उमेदवारांनी केलेले ‘उद्योग’ अमळनेरकरांना माहीत आहेत, त्यामुळे २ डिसेंबर रोजी जनता योग्य उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​विकासाचे नवे पर्व..
​शिरीष चौधरी यांनी डॉ. बाविस्कर यांना उमेदवारी देताना त्यांच्या अभ्यासू आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक असलेल्या व्यक्तिमत्त्वाची दखल घेतली आहे. ​उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरला विकासासाठी महत्त्वाचा निधी मिळून शहरात विकासाचे नवे पर्व सुरू होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ​अखेरीस, अमळनेरकर यावेळी प्रामाणिकता आणि विकासाला मतदान करून २ डिसेंबर रोजी इतिहास घडवतील, असा निर्धार शहरवासीयांनी केल्याचे त्यांनी सांगितले.


 

Tags: #political#shirishchaudhariAmalnerShivsena
Next Post
एरंडोल नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ५ आणि ८ मध्ये आ.अमोल पाटीलांच्या नेतृत्वाखाली महायुतीची विजयी रॅली!

एरंडोल नगरपरिषद निवडणूक : प्रभाग ५ आणि ८ मध्ये आ.अमोल पाटीलांच्या नेतृत्वाखाली महायुतीची विजयी रॅली!

ताज्या बातम्या

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सवात नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि ‘बॉलीवूड घराना’ची मेजवानी

November 27, 2026
बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
खान्देश

बोपदेव घाटात भीषण अपघात; जळगावच्या मोहिनीसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

November 27, 2026
कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
गुन्हे

कजगाव गोळीबार प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 27, 2026
रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
खान्देश

रझा कॉलनीत घरफोडी; दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

November 27, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

शिवशाही बसमध्ये महिलेच्या बॅगेतून ४.६३ लाखांचा ऐवज लंपास

November 27, 2026
जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी
खान्देश

जळगावात ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन; चित्रपटांची व जादूची दुहेरी मेजवानी

November 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add