• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन! शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन आणि ई-स्कूटर जिंकण्याची संधी!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 20, 2025
in कृषी, खान्देश, जळगाव जिल्हा
0
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन! शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन आणि ई-स्कूटर जिंकण्याची संधी!

​जळगाव, (प्रतिनिधी) : कृषी विस्तार क्षेत्रात गेल्या ११ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगाव शहरात उद्यापासून (२१ नोव्हेंबर) चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. एकलव्य क्रीडा संकुल येथे २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या ११ व्या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे नवतंत्रज्ञान, हायटेक फार्मिंग आणि शेतीत मजुरीला पर्याय ठरतील अशा ड्रोन, लहान-मोठे शेती यंत्र व अवजारांवर विशेष भर देण्यात आला आहे.

​२१० हून अधिक स्टॉल्सचे आकर्षण..
​या प्रदर्शनात २१० पेक्षा अधिक स्टॉल्स असून, त्यापैकी सुमारे ४५ स्टॉल्स लहानमोठी कृषी यंत्रे व अवजार असणार आहेत. बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती आणि कमी पाण्यात येणारी पिके अशा आजच्या गरजेवर आधारित मांडणी हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे.

​एकाच छताखाली मिळणार उपयुक्त माहिती..
​शेतकऱ्यांना विविध पिकांतील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, परसबाग/टेरेस गार्डनसाठी रोप (नर्सरी), फळे-भाजीपाल्याच्या नर्सरी, सोलर फार्मिंग, झटका मशीन, फवारणीसाठी ड्रोन, तसेच बँक, शासकीय विभाग आणि अनुदानाबाबतची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. टिशूकल्चर केळीच्या कंपन्या आणि किचन गार्डन टूल्सचे स्टॉल्सही यात समाविष्ट आहेत. कमी पाण्यात, कमी श्रमात आणि हमीचे उत्पन्न देणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शनही येथे उपलब्ध असेल.

​बक्षिसांची लयलूट आणि मोफत बियाणे..
​या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसांची संधी आहे. निर्मल सीडसतर्फे पहिल्याच दिवशी, म्हणजे २१ नोव्हेंबरला, पहिल्या पाच हजार जणांना किचन गार्डन बियाणे पाकीट मोफत वितरित केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, रोज शंभरपेक्षाही अधिक जणांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकता येतील. तसेच, सिका ई-मोटर्सतर्फे ई-स्कूटरचे बंपर बक्षीस जिंकण्याचीही सुवर्णसंधी उपलब्ध आहे. ​ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या आधुनिक कृषी प्रदर्शन आणि यंत्र-अवजारे प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
​

Tags: #agroworld#jalgaon_city
Next Post
एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई! ६१ गॅस सिलेंडर चोरीचे प्रकरण उघड

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई! ६१ गॅस सिलेंडर चोरीचे प्रकरण उघड

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add