• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव पोलिसांची धडक कारवाई: मुक्ताईनगरमध्ये २३ लाखांची गांजाची अवैध शेती उध्वस्त!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 20, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगाव पोलिसांची धडक कारवाई: मुक्ताईनगरमध्ये २३ लाखांची गांजाची अवैध शेती उध्वस्त!

जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव आणि मुक्ताईनगर पोलिसांनी संयुक्तरीत्या धडक कारवाई करत, मानेगाव (ता. मुक्ताईनगर) येथील एका शेतात केलेली गांजाची मोठी अवैध लागवड उध्वस्त केली आहे. या कारवाईत तब्बल ₹ २३,२२,२००/- किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी मानेगाव, ता. मुक्ताईनगर येथील मनोज नामदेव घटे (वय ४०) याच्या शेतात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपीच्या शेतातून ५१ नग गांजाची हिरवी झाडे जप्त केली, ज्यांचे एकूण वजन ३ क्विंटल ४१ किलो ५०० ग्रॅम (३४१ किलो ५०० ग्रॅम) इतके आहे. ​जप्त केलेल्या या मोठ्या साठ्यामुळे जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ​याप्रकरणी आरोपी मनोज घटे याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक ​डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुक्ताईनगर सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोउपनि सोपान गोरे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, रफिक शेख, प्रेमचंद सपकाळे, विनोद पाटील, सलीम तडवी, श्रीकृष्ण देशमुख, छगन तायडे, रतन गिते, मयुर निकम, रविंद्र चौधरी, भरत पाटील. ​मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ, सपानि जयेश पाटील, पोउपनि निलेश गोसावी, पोहेकॉ चंद्रकांत बोदडे, मोतीलाल बोरसे, चेतन महाजन, रविंद्र धनगर, दिपक ठाकरे, गोविंद पवार, श्रावण भिल, जितेंद्र महाजन आधी पोलीस कर्मचाऱ्यांचा कारवाईत सहभाग होता.

Tags: CrimemuktainagarPolice
Next Post
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन! शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन आणि ई-स्कूटर जिंकण्याची संधी!

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन! शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन आणि ई-स्कूटर जिंकण्याची संधी!

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group