• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एरंडोल : नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या प्रचारार्थ आ. अमोल पाटील यांची भव्य रॅली!

​डॉ. ठाकूर यांच्या सुशिक्षित नेतृत्वामुळे विकासाला मिळेल नवी दिशा, मतदारांमध्ये विश्वास

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 20, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
एरंडोल : नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या प्रचारार्थ आ. अमोल पाटील यांची भव्य रॅली!

​एरंडोल, (प्रतिनिधी) : एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉ. नरेंद्र धुडकु ठाकूर यांच्या प्रचारार्थ, तसेच प्रभाग क्रमांक ३ अ च्या उमेदवार छाया आनंद दाभाडे आणि ब च्या कमला गोपाळ पाटील यांच्या समर्थनार्थ, एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा चिमणराव पाटील यांची भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभा बुधवारी प्रभाग क्र. ३ परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली.

​एरंडोल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक उच्चशिक्षित, अनुभवी आणि चारित्रसंपन्न उमेदवार म्हणून डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्याकडे आज एरंडोलकर आशेने पाहत आहेत. याच विश्वासाच्या बळावर, भाजप शिवसेना युतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांचा विजय मोठ्या मताधिक्याने होईल, असा दृढ विश्वास आमदार अमोलदादा पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

​​जनतेचा प्रचंड पाठिंबा लाभलेल्या या रॅलीत विकासाच्या निर्धाराने घोषणाबाजी करण्यात आली. एरंडोलकरांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद महायुतीच्या विजयाचा मार्ग निश्चितच मजबूत करणारा आहे. ​याप्रसंगी भाजपा-शिवसेना युतीचे प्रभाग क्र. ३ चे उमेदवार छाया दाभाडे, कमला गोपाळ पाटील यांच्यासह सुनीलभैय्या पाटील, शालिक गायकवाड, रवींद्र जाधव, जयश्री पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

​​या सभेला कुणाल महाजन, रुपेश महाजन, डॉ. नरेंद्र पाटील, सुभाष पाटील, आनंद दाभाडे, डॉ. गीतांजली ठाकूर यांच्यासह विश्वनाथ महाजन, बापू चोधरी, शांताराम महाजन, मांगीलाल ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासारख्या सुशिक्षित नेतृत्वामुळे एरंडोलच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मतदारांमध्ये दिसत आहे.

Tags: #dr.narendrathakur#politicalBjperandolShivsena
Next Post
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५; उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक.. – जिल्हाधिकारी रोहन घुगे

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५; उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक.. - जिल्हाधिकारी रोहन घुगे

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group