• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला ‘प्लेक्सकॉन्सिल’चे विक्रमी ८ पुरस्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 17, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला ‘प्लेक्सकॉन्सिल’चे विक्रमी ८ पुरस्कार

​जळगाव, (प्रतिनिधी) : कृषी क्षेत्राला पाणी बचतीतून समृद्धीकडे नेणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने पुन्हा एकदा निर्यातीत आपले जागतिक वर्चस्व सिद्ध केले आहे. कंपनीला प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (PLEXCONCIL) तर्फे २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांसाठी विविध गटांमधून तब्बल आठ निर्यात उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आले.

​मुंबई येथील हॉटेल द लीला येथे पार पडलेल्या या शानदार समारंभात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन आणि त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. ​जैन इरिगेशनने ठिबक सिंचन, पीव्हीसी फोमशीट, फिटिंग्ज आणि होसेस या विभागांतील उत्कृष्ट निर्यात कामगिरीसाठी हे पुरस्कार पटकावले असून, कंपनीने निर्यात पुरस्कारांमध्ये ‘हॅट्रीक’ केली आहे.

​PLEXCONCIL च्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात मंत्री पीयूष गोयल यांनी प्लास्टिक क्षेत्राच्या शाश्वत विकासातून अर्थव्यवस्थेला बळ देण्याच्या भूमिकेचे कौतुक केले. १९९१ पासून जैन इरिगेशनला दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.

▪️‘गुणवत्ता ही बाजारपेठेमध्ये विकत मिळत नसते तर ती प्रत्यक्ष जीवनात उतरावी लागते’ हे श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंचे विचार प्रत्येक सहकाऱ्यांमध्ये संस्कारीत झाले आहे. यातून कृषी क्षेत्रामध्ये शाश्वतता आणण्यास प्रत्येक सहकारी प्रयत्न करत आहे. प्लास्टिककल्चरतून शेतीला कमीत कमी संसाधनातून उत्कृष्टतेकडे घेऊन आले आहे. जैन इरिगेशनच्या सहा दशकाच्या कार्याला अधोरेखित करुन १९९१ पासून ही पारितोषिके प्राप्त होत आहे. कंपनीच्या विविध विभागांमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा व भूमिपुत्रांच्या कष्टांना समर्पित हा पुरस्कार असल्याचे मी मानतो.
– अशोक भवरलाल जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव

Next Post
‘हिंदुहृदयसम्राट’ बाळासाहेब ठाकरे यांना जळगावात शिवसैनिकांचे ‘स्मृती अभिवादन’!

'हिंदुहृदयसम्राट' बाळासाहेब ठाकरे यांना जळगावात शिवसैनिकांचे 'स्मृती अभिवादन'!

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add