• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्ह्यावर गुन्हेगारीचे सावट: एरंडोलच्या कढोलीत तरुणावर दिवसाढवळ्या गोळीबार!

सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात गोळीबार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 3, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यावर गुन्हेगारीचे सावट: एरंडोलच्या कढोलीत तरुणावर दिवसाढवळ्या गोळीबार!

​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी कळस चढवला असून, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील कढोली गावात आज दि.३ नोव्हेंबर ला दुपारी ४ च्या सुमारास एका ३१ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारांसाठी जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

​​प्राथमिक माहितीनुसार, जखमी तरुण एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. उद्या दि.४ रोजी पारोळा येथे होणाऱ्या रथोत्सवासाठी तो आपल्या आई-वडिलांसोबत जाणार होता. आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास तो कढोली गावात घराच्या मागील बाजूस उभा असताना, अचानक गोळी येऊन ती त्याच्या हाताच्या खांद्याखाली छातीजवळ घुसली.

​या हल्ल्यामुळे तरुणाला मोठा रक्तस्राव झाला, ज्यामुळे त्याला त्वरित उपचारांसाठी जळगाव येथे हलवावे लागले.​सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारे आरोपी जखमी तरुणाच्या परिचयाचे असण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे गावात आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​या घटनेबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एरंडोल पोलीस घटनास्थळ (कढोली गाव) आणि गोळीबारामागील नेमके कारण काय होते, याचा कसून तपास करत आहेत

Tags: #jalgaon #maharashtraCrimePolice
Next Post
रथोत्सवात महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या ‘लेडीज गँग’ला अटक; ७७ हजारांचा ऐवज हस्तगत

रथोत्सवात महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या 'लेडीज गँग'ला अटक; ७७ हजारांचा ऐवज हस्तगत

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group