• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 31, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, धार्मिक
0
केरळी महीला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदीरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाचे आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : निवृत्ती नगर येथील केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाचा शुभारंभ शुक्रवार, ०४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३७ वाजता होणार आहे. या उत्सावासाठी मंदिरात तयारी सूरू आहे.

भाविकांना मंदिर दर्शनासाठी ०४ नोव्हेंबर रात्री ९.३७ पासून ते ०७ नोव्हेंबर सकाळी ६.५२ वाजेपर्यंत प्रवेश मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव अयप्पा स्वामी मंदिर असून, येथे प्राणप्रतिष्ठा पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने केली गेली आहे. प्रत्येक वर्षी कार्तिक पौर्णिमेचा शुभ मुहूर्त केरळमधील गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली निश्चित केला जातो, ही या मंदिराची खास परंपरा आहे.

या वर्षी पौर्णिमा व कृतिका नक्षत्राचा योग असून पौर्णिमा ०४ नोव्हेंबर रात्री ९.३७ पासून ते ०५ नोव्हेंबर संध्याकाळी ७.२० पर्यंत असून, कृतिका नक्षत्र ०६ नोव्हेंबर सकाळी ८.३२ पासून सूरू होवून ७ नोव्हेंबर सकाळी ६.५२ वाजेपर्यंत राहील, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले आहे. या कालावधीत शहरातील मान्यवरांच्या हस्ते विविध पूजा आणि अभिषेक विधी पार पडणार आहेत.

मंदिरात महाबलीपुरम (तामिळनाडू) येथून मंगवलेली कार्तिकस्वामीची मूर्ती, तसेच कोटायम तंथनम प्रतिकृती, मथुराई मिनाक्षी देवी आणि गुरूवायुर श्री विष्णू यांच्या मूर्ती विराजमान आहेत. चेन्नईहून मागविलेल्या १०८ नाण्यांद्वारे सोने-चांदी अभिषेक केला जातो. या काळात दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते, म्हणून हजारो भाविक नवस फेडण्यासाठी येथे येतात.हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.

गेल्या २५ वर्षांपासून कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिर केरळी पद्धतीने सजवून भाविकांसाठी खुले केले जाते. मंदिरात नवग्रह व इतर देवतांची मंदिरेही असून, ती वर्षभर दर्शनासाठी खुली असतात. या उत्सवाची जोरदार तयारी सूरू असून भाविकांच्या सुविधेसाठी गुरूजी, मंडम, रोषणाईचे काम सूरू आहे तरी भाविकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Next Post
‘कबचौउमवि’तर्फे दिलीप तिवारी यांना पी.एच.डी. प्रदान

'कबचौउमवि'तर्फे दिलीप तिवारी यांना पी.एच.डी. प्रदान

ताज्या बातम्या

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक
गुन्हे

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

March 18, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त
गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त

March 18, 2026
कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group