• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 23, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
आठ वर्षांनंतर आरोपीला अटक, अंदाजे १२ लाखांचे सोने केले हस्तगत

जळगाव, (प्रतिनिधी) : रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका जुन्या अपहार प्रकरणात तब्बल ८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक पोलिसांनी वाराणसी, उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून अपहार केलेली ११ लाख ९० हजार किमतीची १०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड देखील हस्तगत करण्यात आली आहे.

हा गुन्हा ३० मार्च २०१७ रोजी दाखल झाला होता. फिर्यादी सचिन वसंतराव भामरे (रा. आर एल कॉलनी गांधी नगर, जळगाव) यांच्या पिंप्राळा परिसरातील सोमाणी मार्केट येथील ‘साई ज्वेलर्स’ या दुकानात काम करणारा कामगार, सुशांत सुनील कुंडू, याने दागिने बनवण्यासाठी दिलेले एकूण 30 तोळे वजनाचे सोने घेऊन आपले मूळ गाव पश्चिम बंगाल येथे पलायन केले होते. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा वेळोवेळी शोध घेतला, परंतु तो मिळून आला नव्हता आणि गुन्हा तपासावर कायम होता.

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व रामानंद नगर पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने या जुन्या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष केंद्रित केले.

दरम्यान, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सपोनि भुषण कोते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथक शोध घेण्यासाठी रवाना झाले. पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर फरार आरोपी सुशांत सुनील कुंडू (वय-३९, रा. नस्कर पारा, संत्रागाच्छी, जि. हावडा, पश्चिम बंगाल) यास वाराणसी, उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि भुषण कोते यांनी सुरू ठेवला. त्यांच्या तपासानुसार, आरोपीकडून कोलकाता, पश्चिम बंगाल येथून अंदाजे ११ लाख ९० हजार किमतीची १०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे.

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
“पाडवा पहाट” नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध

"पाडवा पहाट" नाट्यसंगीत-अभंग वाणीने रसिक मंत्रमुग्ध

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!
जळगाव जिल्हा

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

June 8, 2026
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group