• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

सीईओ मिनल करनवाल यांची उपस्थिती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 14, 2025
in कृषी, खान्देश, जळगाव जिल्हा
0
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

जळगाव, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाला, विशेषतः वनराई बंधारे बांधण्याच्या कार्याला, मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी एकाच दिवसात जिल्हाभरात तब्बल ३८१ वनराई बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले.

याच उपक्रमांतर्गत, जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे सोमवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. जिल्हा सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य, तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवला.

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी ‘वनराई बंधाऱ्यांमुळे जलसंधारण, भूजल पातळीत वाढ, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरण संवर्धन या सर्व घटकांमध्ये सकारात्मक बदल होतो. ग्रामीण भागातील लोकांनी अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यास जलसंपत्ती टिकविणे व सशक्त ग्रामविकास साध्य होऊ शकतो,’ असे मत व्यक्त केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राहुल जाधव यांच्यासह अनेक अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात 'मानवी आकाशकंदिल' साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

ताज्या बातम्या

भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!
गुन्हे

भुसावळात ३० हजारांची लाच मागणाऱ्या फौजदारासह खाजगी इसमावर गुन्हा; पोलीस उपनिरीक्षक फरार!

May 29, 2026
पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित
जळगाव जिल्हा

पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल: डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित

May 29, 2026
विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!
जळगाव जिल्हा

विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था जागेसाठी​भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत!

May 29, 2026
जळगावच्या केळी निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना
कृषी

जळगावच्या केळी निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना

May 29, 2026
रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात
आरोग्य

रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात

May 28, 2026
कानाचा साधा संसर्ग समजू नका; डोकेदुखी ठरली दुर्मिळ आजाराचे लक्षण! डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार
आरोग्य

कानाचा साधा संसर्ग समजू नका; डोकेदुखी ठरली दुर्मिळ आजाराचे लक्षण! डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार

May 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group