• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 14, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

मुंबई, (वृत्तसेवा) : येथील हॉटेल ताज लँड्स एन्ड्स, बांद्रा येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत आयोजित “राज्य निर्यात पुरस्कार वितरण सोहळा” भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला. या सोहळ्यात सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांतील उत्कृष्ट निर्यात कामगिरी करणाऱ्या उद्योगांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार कंपनीच्या उत्कृष्ट निर्यात कार्याची दखल घेऊन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अभेद्य जैन आणि अमोली जैन यांनी स्वीकारला. सूक्ष्म सिंचन आणि कृषी क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रतिष्ठित “राज्य निर्यात पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

या निर्यात पुरस्कारात २०२३-२४ या वर्षासाठी प्लास्टिक आणि लिनोलियम उत्पादने अंतर्गत पीव्हीसी फोमशीट उत्पादन विभागासाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश, सुवर्ण (गोल्ड) (उलाढाल – ८७.४३) तर २०२२-२३ या वर्षासाठी प्लास्टिक आणि लिनोलियम उत्पादने अंतर्गत प्लास्टिक उत्पादने, सूक्ष्म सिंचन प्रणाली, पीव्हीसी व एचडीपीई पाईप्स, मोल्डेड वस्तू आणि शीटस् विविध प्रकार उत्पादन विभागासाठी देखील ५१ हजार रुपयांचा धनादेश, सुवर्ण (गोल्ड) पुरस्कार देऊन गौरविले गेले. यात कंपनीने ३४२.२८ इतकी उलाढाल केली आहे. कंपनीच्या या कामगिरीस अधोरेखित करून दोन्ही वर्षासाठी सुवर्ण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

प्लास्टिक उत्पादन क्षेत्रातील लार्ज स्केल उद्योजकता आणि फोम शीट निर्मितीतील १००% निर्यातोन्मुख युनिट (EOU) या दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, जळगाव यांना महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राज्य शासनामार्फत दरवर्षी विविध उद्योग क्षेत्रांमधील आदर्श कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या पुरस्कारांनी कंपनीचा सातत्याने गौरव होत आला आहे.

हा तर शेतकऱ्यांचा गौरव – अशोक जैन
या सन्मानाबद्दल आपले विचार व्यक्त करताना कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, “ हा पुरस्कार भारताच्या शेतकऱ्यांचा आणि औद्योगिक प्रगतीचा गौरव म्हणता येईल. आम्ही हा सन्मान देशातील शेतकरी बांधवांना आणि कंपनीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेल्या शेतकऱ्यांना समर्पित करत आहोत. निर्याती बद्दल मिळालेला हा पुरस्कार जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांच्या कठोर परिश्रमांचा आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याचा सन्मान म्हणायला हवा. ‘सार्थक करूया जन्माचे रुप पालटु वसुंधरेचे’ या ध्येयवाक्यासह जैन इरिगेशनने जागतिक बाजारपेठेत निर्यातीच्या माध्यमातून भारतीय तंत्रज्ञानाचा अमिट असा ठसा उमटवला आहे. राज्य शासनाने आमच्या प्रयत्नांची दखल घेऊन दिलेला हा सन्मान आमच्या जबाबदारीत वृद्धी करणारा आणि नवे बळ देणारा ठरलेला आहे.”

Tags: #jainirigation#jalgaon_city
Next Post
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत 'वनराई बंधारा' निर्मितीचा आदर्श

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group