• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘फ्लो डायव्हटर’ वापरून दुर्मीळ मेंदूच्या रक्तवाहिनीच्या फुग्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

भुसावळच्या महिलेला मिळाले नवजीवन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 27, 2025
in आरोग्य, खान्देश, जळगाव जिल्हा
0
‘फ्लो डायव्हटर’ वापरून दुर्मीळ मेंदूच्या रक्तवाहिनीच्या फुग्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव, (प्रतिनिधी) : आचेगाव (तालुका भुसावळ) येथील रहिवासी श्रीमती अलका रविंद्र भोळे यांना अचानक डाव्या डोळ्याची पापणी पडून दिसण्यास त्रास सुरू झाला होता. महिनाभर अनेक ठिकाणी उपचार घेऊनही अचूक निदान न झाल्याने त्यांच्या प्रकृतीत फरक पडत नव्हता. अखेरीस त्यांनी जळगाव येथील डॉ. निलेश किनगे (ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल, जळगाव) यांच्याकडे तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

डॉ. किनगे यांनी श्रीमती भोळे यांची तपासणी करून मेंदूचा आणि मेंदूतील नसांचा एमआरआय (MRI) करण्याचा सल्ला दिला. या तपासणीत त्यांच्या मेंदूतील डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांपैकी एका वाहिनेतील असामान्य (Abnormal) फुगा फुटून रक्तस्राव झाल्याचे निदान झाले.

या दुर्मिळ व गुंतागुंतीच्या स्थितीवर अधिक स्पष्टतेसाठी डॉ. किनगे यांनी त्यांना रुग्णालयात दाखल होऊन मेंदूची ॲन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. ॲन्जिओग्राफीमध्ये मेंदूतील डाव्या बाजूच्या डोक्याच्या धमनीत मोठा फुगा (Left PCOM Aneurysm) असल्याचे स्पष्ट झाले.
हा फुगा मोठा असल्याने आणि त्याची ‘मान’ मोठी असल्याने, डॉ. निलेश किनगे यांनी प्रगत तंत्रज्ञान वापरून ‘फ्लो डायव्हटर’ (Flow Diverter) टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जर्मन बनावटीचा ‘ब्लास्ट कंपनी’चा ‘सिल्क व्हिस्टा’ स्टेंट वापरून फुगा यशस्वीरित्या बंद केला. ही शस्त्रक्रिया अत्यंत अवघड मानली जाते आणि सहसा पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध असते.

डॉ. निलेश किनगे यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. यासाठी त्यांना डॉ. विनोद किनगे (भूलतज्ञ), डॉ. वैजयंती किनगे (रेडिओलॉजिस्ट) आणि डॉ. संजीव हूजुरबाजार (न्यूरोसर्जन) यांचे सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या चार तासांत रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर आले आणि आता त्यांची प्रकृती पूर्णपणे सुधारली आहे. डॉ. निलेश किनगे गेल्या दहा वर्षांपासून जळगाव शहरात अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या न्यूरोलॉजिकल शस्त्रक्रिया यशस्वीपणे करत आहेत.

डोक्याला मार लागणे, मेंदूत रक्तस्राव, लकवा (पॅरालिसिस), अचानक दिसणे बंद होणे, चक्कर येणे, वारंवार डोकेदुखी, अपघात किंवा कोणत्याही प्रकारच्या नसांसंदर्भातील (Neurological) त्रास जाणवल्यास दुर्लक्ष न करता तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉ. निलेश किनगे यांनी केले.

VIDEO


 

Tags: #dr.nileshkinage#hospital#medical
Next Post
कवी महानोर यांचे साहित्यासह शेती, पाण्यासाठी मोलाचे कार्य – अशोक जैन

कवी महानोर यांचे साहित्यासह शेती, पाण्यासाठी मोलाचे कार्य - अशोक जैन

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add