• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावकरांसाठी नवी खाऊ गल्ली : महिला बचत गटांना बारमाही उत्पन्नाचा स्रोत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगावकरांसाठी नवी खाऊ गल्ली : महिला बचत गटांना बारमाही उत्पन्नाचा स्रोत

जळगाव, (प्रतिनिधी) : खाऊ गल्ली या उपक्रमातून नागरिकांना वर्षभर महिला बचत गटांनी बनवलेली उत्पादने उपलब्ध होणार असून, ग्रामीण महिलांच्या हातच्या पारंपरिक, सुगरणींच्या चविष्ट पदार्थांची खाऊ गल्लीमध्ये खास चव चाखता येणार आहे. महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनाचे हे नवे पर्व आहे. २२ जुलै रोजी सुरू करण्यात आलेले बहिणाबाई मार्ट व खाऊ गल्ली ग्रामीण महिलांना बारमाही उत्पन्नाचा स्रोत ठरेल व त्यांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळेल,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी केले.

जळगावकरांच्या चवीला नवा रंग आणि महिला बचत गटांच्या स्वावलंबनाला नवे पंख देणारा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या पुढाकारातून आज शहरात सुरू झाला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महिला बचत गटाच्या खाऊ गल्लीचे उद्घाटन जिल्हा परिषद बचत भवन, राजकमल टॉकीजजवळ, उत्साहात पार पडले.

यावेळी आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, शिवसेनेच्या सरिता माळी, जिल्हाप्रमुख विष्णूभंगाळे, महिला बचत गटांच्या सीआरपी आणि प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होते.

खाऊ गल्ली खवय्यांसाठी नंदनवन ठरेल – मिनल करनवाल
खाऊ गल्लीत महिला बचत गटांना स्वतंत्र स्टॉल देण्यात आले असून, नाममात्र भाड्यात नागरिकांना पारंपरिक चवीचा आनंद घेता येणार आहे. जळगावच्या मध्यवर्ती भागातील ही खाऊ गल्ली खवय्यांसाठी नंदनवन ठरेल आणि महिलांच्या स्वावलंबनाचे नवे मापदंड निर्माण करेल,” असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी व्यक्त केला.


 

Tags: #jalgaon #maharashtra#जिल्हापरिषद#बचतगट
Next Post
जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे सोमवारी भव्य उद्घाटन

जळगावात 'हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्' चे सोमवारी भव्य उद्घाटन

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add