• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बंगळूर येथील घटनेचा राष्ट्रवादीतर्फे जळगावात निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दूग्ध अभिषेक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 19, 2021
in जळगाव जिल्हा
0
बंगळूर येथील घटनेचा राष्ट्रवादीतर्फे जळगावात निषेध

जळगाव, दि. 19 – बंगळूर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

त्याच प्रमाणे निंदनीय व संतापजनक घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कुठलीही कारवाई न करता समाजकंटकांना पाठीशी घातल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला. या संपुर्ण प्रकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रविवार शहरातील शिवतीर्थ मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पाण्याने धुण्यात आले. व त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीला पंचामृताने अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे व आमच्या अस्मितेचा कुणी अपमान करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी , जेणेकरून यापुढे कुणीही असे निंदनीय काम करण्याची हिंमत करणार नाही. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी यापुढे असे बेताल वक्तव्य करू नये. असे मत माजी मंत्री तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केले. दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देऊन घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस ऐजाज मलिक, जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक पाटील, महिला आघाडी महानगर अध्यक्षा मंगला पाटील, दिलीप माहेश्वरी, विनोद देशमुख, मजहर पठाण, सुनिल माळी, अमोल कोल्हे, वाय.एस. महाजन, सुशील शिंदे, विशाल देशमुख, किरण राजपूत, राजूभाऊ मोरे, रमेश बाऱ्हे, अशोक सोनवणे, जितेंद्र चांगरे, राहुल टोके, सचिन पाटील, मुविकोरोज कोल्हे, पंकज वाघ, यशवंत पाटील यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
परिवर्तन संस्थेच्या ‘भाऊंना भावांजली’चा समारोप

परिवर्तन संस्थेच्या 'भाऊंना भावांजली'चा समारोप

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज
खान्देश

जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज

December 16, 2025
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
खान्देश

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

December 15, 2025
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!
खान्देश

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

December 15, 2025
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!
खान्देश

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

December 15, 2025
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
खान्देश

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

December 15, 2025
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
खान्देश

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

December 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group