जळगाव, (प्रतिनिधी) : मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्रीरामदेवजी बाबा यांच्या दशमी आणि सव्वा महिन्याच्या उपवासाची सांगता, २ सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. या निमित्ताने गुरुनानक नगरातील ममूराबाद रस्त्यावरील हनुमान मंदिरात भंडारा (महाप्रसाद) चे आयोजन करण्यात आले होते.
भंडाऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी दुपारी १२ वाजता श्री रामदेवबाबांची आरती उत्साहात पार पडली. यावेळी शिवचरणजी ढंडोरे, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर (शनिपेठ पोलीस ठाणे) यांच्यासह पोलीस कर्मचारी योगेश साळवे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप सुरू झाले.
यावेळी प्रेम पवार, कन्हैया जाधव, नंदलाल गोडाले, राजेश चावरिया, राम भैया पवार, पवन जाधव, कुणाल पवार, राहुल पवार, वीनू पवार, अॅड. विशाल रील, शुभम पवार, अजय अटवाल, सोनू चिरावंडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन भक्तिमय वातावरणात या उपवासाची सांगता केली आणि बाबांचा आशीर्वाद घेतला.