• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात ‘कॉफी कट्टा’वर पोलिसांचा छापा, अश्लील चाळे करताना तरूण-तरूणी रंगेहाथ

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 14, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात ‘कॉफी कट्टा’वर पोलिसांचा छापा, अश्लील चाळे करताना तरूण-तरूणी रंगेहाथ

कॅफे चालकावर गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली सुरू असलेल्या एका अवैध कॅफेचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कॅफेमध्ये पडदे लावून केलेल्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये शाळकरी व महाविद्यालयीन मुले-मुली अश्लील चाळे करत असताना पोलिसांच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी एकूण ७ जोडप्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना बोलावून समज दिली. या प्रकरणी कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर येथे नुकत्याच झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅफे तपासण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आस्वाद चौकाजवळ असलेल्या ‘कॅफे कॉलेज कट्टा’ या ठिकाणी अचानक छापा टाकला. छाप्यादरम्यान, कॅफेमध्ये ३x३ फुटांचे आणि ५ फूट उंचीचे प्लायवुडचे छोटे कप्पे तयार केलेले आढळले. त्यांना बाहेरून पडदे लावलेले होते आणि आतमध्ये बसण्यासाठी सोफे ठेवले होते. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा या कप्प्यांमध्ये ७ जोडपी अश्लील चाळे करत होती. पोलिसांनी त्यांना बाहेर बोलावून माहिती घेतली आणि त्यांच्या पालकांना बोलावून समज दिली.

पोलिसांनी केलेल्या तपासणीत, या कॅफेमध्ये कॉफी बनवण्यासाठी लागणारे कोणतेही साहित्य किंवा परवाना आढळला नाही. यावरून हा कॅफे केवळ अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी चालवला जात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी, मुकेश वसंत चव्हाण (वय ३०) या कॅफे चालकाविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र राठोड करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोलीस नाईक योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सूर्यवंशी, आणि महिला पोलीस स्वाती पाटील यांचा सहभाग होता.


 

Tags: #caffe#jalgaon_cityCrime
Next Post
जामनेर | तरुणाच्या हत्येप्रकरणी ‘मॉब लिंचिंग’चा गुन्हा, आणखी चौघे अटकेत

जामनेर | तरुणाच्या हत्येप्रकरणी 'मॉब लिंचिंग'चा गुन्हा, आणखी चौघे अटकेत

ताज्या बातम्या

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

भक्तीमय वातावरणात गुढीपूजन; मेहरूण परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

March 19, 2026
अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद
गुन्हे

अमळनेर येथील ५.२७ लाखांच्या लुटीचा छडा; धुळ्याचा सराईत गुन्हेगार जेरबंद

March 18, 2026
‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम
जळगाव जिल्हा

‘चला, मुक्या जीवांचे रक्षण करूया’! ; मुनोत परिवारातर्फे मोफत ‘जलकुंड’ आणि ‘परळ’ वाटप उपक्रम

March 18, 2026
जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक
गुन्हे

जादा दराने स्टॅम्प पेपरची विक्री; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्टॅम्प वेंडरसह भावाला अटक

March 18, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त
गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत दुचाकी चोरटा जेरबंद; १० मोटारसायकली जप्त

March 18, 2026
कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group