• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

घरफोडी करणारा अट्टल चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात, २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 8, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
घरफोडी करणारा अट्टल चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात, २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, (प्रतिनिधी) : एमआयडीसी परिसरात घरफोडी करून १८५,००० रुपयांचे तांब्याचे तार चोरून नेणाऱ्या एका अट्टल चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या या आरोपीकडून पोलिसांनी २७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. १६ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान, जगवाणी नगर येथील एका दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी १८५,००० रुपये किमतीचे तांब्याचे तार चोरून नेले होते. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने तपास करत यापूर्वी दोन आरोपींना अटक केली होती. मात्र, या टोळीतील मुख्य आरोपी, शिकवणसिंग बरियामसिंग उर्फ पटमलसिंग टाक, हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.

४ ऑगस्ट रोजी, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वाघनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी घेऊन त्याची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान, त्याने चोरलेले २७,००० रुपये किमतीचे ५० किलो वजनाचे तांब्याचे तार पोलिसांना काढून दिले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोउपनि राहुल तायडे, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना प्रदीप चौधरी आणि पोकॉ निलेश पाटील यांचा समावेश होता. पुढील तपास पोउपनि राहुल तायडे व पोकॉ निलेश पाटील करत आहेत.

Tags: Crime
Next Post
बालरंगभूमी परिषद, जळगाव: ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रमात शिवचरित्राचे सादरीकरण

बालरंगभूमी परिषद, जळगाव: 'इतिहास महाराष्ट्राचा' उपक्रमात शिवचरित्राचे सादरीकरण

ताज्या बातम्या

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव
जळगाव जिल्हा

बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add