• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतात काम करणाऱ्या ७३ वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला; जागीच मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 4, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेतात काम करणाऱ्या ७३ वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला; जागीच मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील देवगाव येथे गिरणा धरणाजवळ शेतात काम करत असलेल्या ७३ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या हल्ल्यात इंदुबाई वसंत पाटील (वय ७३, रा. देवगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सोमवार, ४ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजता इंदुबाई पाटील या त्यांच्या शेतात काम करत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत कोणीही नसल्याने मदतीसाठी कोणी धावून आले नाही.

नंतर शेतात काम करणाऱ्या बाळू पुना पाटील आणि रमेश पौलाद सोनवणे यांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी तातडीने पोलिसांना आणि वनविभागाला याची माहिती दिली. घटनास्थळी बिबट्याचे पायांचे ठसे आढळून आले आहेत. पोलिसांनी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. इंदुबाई पाटील यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे देवगावमधील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, वनविभागाने तात्काळ बिबट्याचा शोध घेऊन त्याला पकडण्याची मागणी होत आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.


 

Next Post
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; ‘चेस इन स्कूल’ उपक्रमावर विशेष भर

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; 'चेस इन स्कूल' उपक्रमावर विशेष भर

ताज्या बातम्या

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव
जळगाव जिल्हा

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

September 13, 2026
सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add