जळगाव, (प्रतिनिधी) : कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त नेरी नाका चौक येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. १ ऑगस्ट १९२० रोजी जन्मलेले अण्णा भाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते, ज्यांनी त्यांच्या साहित्यातून उपेक्षित आणि वंचित समाजाच्या वेदना, संघर्ष आणि स्वाभिमान प्रभावीपणे मांडला.
यावेळी, फाउंडेशनचे मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, ज्येष्ठ समाजसेवक विजय दहियेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे यांच्यासह उमेश माछरेकर, गौतम बागडे, संदीप गारुंगे, पंकज गागडे, संदीप बागडे, राहुल दहियेकर, कार्तिक बाटूंगे आणि कमल गागडे आदी मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.
या सर्वानी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण करून, त्यांनी दाखवलेल्या समाजप्रबोधन, संघर्ष आणि साहित्य या त्रिसूत्रीच्या मार्गावर चालण्याचा निर्धार व्यक्त केला.