जळगाव, दि.16 – भाऊंना भावांजली परिवर्तन महोत्सवाचा पाचवा दिवस काल कथ्थक नृत्याने संपन्न झाला. संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन संस्थेतर्फे भवरलाल जैन यांना आदरांजली वाहणारा महोत्सव भाऊंच्या उद्यानात सुरू आहे. यात काल प्रभाकर कला अकादमीच्या विद्यार्थींनीनी पर्ल्स ऑफ बॉलिवुड सादर केला.
प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगणा अपर्णा भट यांच्या मार्गदर्शनाखाली कथ्थक शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थींनी बॉलिवुडमधील 1957 ते 2018 या काळातील चित्रपट गीतांवर कथ्थकचे सादरीकरण केले. यात प्रामुख्याने ‘हे गजवज महाकाय वक्रतुंड’ या गणरायाला वंदन करून कथ्थक नृत्यास सूरवात झाली. नमो नमो शंकरा, महो रंगदो लाल नंद, ना मानोगे तो, फिर भोर भयी, परवरदी गा, आओ हुजूर, आई ये मेहरबा, सय्या, राधा ढुंढ रही या गाण्यावर नृत्य सादर केली. यात समृद्धी पाटील, संस्कृती गवळे, आनंदी याज्ञीक, जान्हवी पाटील, पुर्वा कुलकर्णी, श्रावणी अर्णीकार, भाग्यश्री पाटील, मधुरा इंगळे, आकांक्षा शिरसाठे, रिद्धी जैन, दिपीका घैसास, दिशा ढगे, हिमानी पिले, कोमल चव्हाण यांनी नृत्यात सहभाग घेतला.
याप्रसंगी माजी नगरसेविका अश्विनी देशमुख, डॉ रवी महाजन, नंदू अडवाणी हे प्रमुख अतिथी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महोत्सव प्रमुख अनिल कांकरिया यांनी केले. तर सुत्रसंचालन हर्षदा कोल्हटकर यांनी केले. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात परिवर्तनचे कार्यक्रम सुरू आहे. आजही अनेकांना जागेअभावी निराश होत परत जावे लागले.