• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बालरंगभूमी परिषदेची ‘दिंडी बालवारकऱ्यांची’ भक्तीमय वातावरणात संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 6, 2025
in जळगाव जिल्हा
0
बालरंगभूमी परिषदेची ‘दिंडी बालवारकऱ्यांची’ भक्तीमय वातावरणात संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे आषाढी एकादशीनिमित्ताने कै.गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यामंदिराच्या सहकार्याने ‘वारी पंढरीची, दिंडी बालवारकऱ्यांची’ या दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात ४०० विद्यार्थी – विद्यार्थिंनींनींसह त्यांचे शिक्षक व पालकांनी सहभाग घेतला होता.

सोहळ्याच्या सुरुवातीला केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कै.परशुराम विठोबा प्राथ. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले. विठ्ठल रखुमाई तसेच विविध संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी – विद्यार्थिंनी सहभागी झाले होते. त्यांच्यासह पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या बालकांचे नृत्य लेझीम, टाळ नृत्य परिसरातील नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. या सोहळ्यातील नृत्य दिग्दर्शन शिक्षक योगेश भालेराव यांचे होते.

बालरंगभूमी परिषदेचे गायक दिपक महाजन, सचिन महाजन व त्यांना संबळवर साथ करणारे अवधूत दलाल यांनी पालखी सोहळ्याची रंगत वाढवली. सुमारे तीन किलोमीटरची वाटचाल करत प्रभात कॉलनीतील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दिंडी सोहळ्याचा समारोप करण्यात आला. यावेळी वारकरी संप्रदायातील संतांची माहिती बालकांना व्हावी म्हणून संत वेशभूषा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते.

पालखी सोहळ्याप्रसंगी बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, दिपक महाजन, पंकज बारी, सुदर्शन पाटील, हर्षल पवार, मोहित पाटील, डॉ.श्रध्दा पाटील यांच्यासह मुख्याध्यापिका धनश्री फालक, उपशिक्षक कल्पना तायडे, सूर्यकांत पाटील, योगेश भालेराव, भावना धांडे, सीमा गोडसे, स्वाती पाटील, योगेश पाटील, दिपक पाटील, चारुलता भारंबे, मीनाक्षी इसे, गायत्री पवार, उज्वला वाशिमकर आदी उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित पालखी व दिंडी सोहळा यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी व कै.गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यामंदिराचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

Next Post
जळगावात रामद्वारा येथे विशेष अखंड राम नामस्मरण सोहळा

जळगावात रामद्वारा येथे विशेष अखंड राम नामस्मरण सोहळा

ताज्या बातम्या

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर
आरोग्य

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर

November 26, 2026
शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद
गुन्हे

शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद

November 26, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध

November 26, 2026
७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

November 26, 2026
महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

November 26, 2026
थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे
जळगाव जिल्हा

थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे

November 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add