जळगाव, दि.14 – संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन संस्थेतर्फे भावांजली महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी “सांस्कृतिक समृद्धी आणि माझं जळगाव या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात जळगावच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विषयावर सखोल चर्चा मान्यवरांनी केली. यात अतुल भाऊ जैन, डॉ. सुधीर भोंगळे, छबिदास राणे, भरत अमळकर , डॉ प्रदीप जोशी, डॉ राजेश पाटील, प्रीती अग्रवाल, डॉ रेखा महाजन, यजुवेंद्र महाजन, गनी मेमन, शिवराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.जळगावच्या माणसांची माणुसकी ही बाहेर कुठेही दिसत नाही. अनेक संधी इथे निर्माण होत आहे. आपण आपल्या गावात खूप गोष्टी आहेत. मोठे उद्योग आहेत.
भरत अमळकर यांनी लोकशाही, तंत्रज्ञान यांचा तरूणाच्या मनावर होणारा परिणाम मांडतांना आपल्या शहराच्या व पिढीच्या सांस्कृतिक भूमिकेवर प्रकाश टाकला.
अतुल जैन यांनी, मी जगभर फिरतोय पण जळगावसारखं गाव नाही. आपल्या गावाच्या विकासाची व समृद्ध करायची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. जैन उद्योग समूह हा भाऊंच्या विचारांवर काम करतोय, ते सातत्य पुढेही कायम राहिल.
डॉ प्रदिप जोशी यांनी, आपण शहरातील नितीमान व गुणसंपन्न माणसांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. डॉ रेखा महाजन यांनी कला ही मानवी संस्कृतीची गरज आहे. जळगावात परिवर्तन उत्तम काम करतेय त्यांच्यासोबत उभे रहावे.
डॉ सुधीर भोंगळे यांनी भाषा व संस्कृती हे महत्त्वाचे अंग असून जळगावची ओळख बदलवली पाहिजे. ती परिवर्तनने सांस्कृतिक केली. यासोबत चर्चासत्रात डॉ प्रीती अग्रवाल, यजुवेंद्र महाजन ,गनी मेमन, डॉ राजेश पाटील, छबिराज राणे, चर्चासत्रात अनिष शहा यांनी भूमिका मांडली. प्रास्ताविक मंजुषा भिडे यांनी केले. तर सुत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.