• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण : जळगावात मॉक पार्लियामेंट, प्रदर्शनी व सत्याग्रहींचा सत्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 26, 2025
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण : जळगावात मॉक पार्लियामेंट, प्रदर्शनी व सत्याग्रहींचा सत्कार

जळगाव, (प्रतिनिधी) : भारतात २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चातर्फे जळगाव येथे मॉक पार्लियामेंट, विशेष माहितीपर प्रदर्शनी आणि सत्याग्रहींच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश तरुण पिढीला आणीबाणी काळातील घटनात्मक व्यत्ययाची माहिती देऊन जागरूकता निर्माण करणे हा होता.

या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या या मॉक पार्लियामेंटमधून युवकांना त्या काळाची जाणीव व्हावी, लोकशाही मूल्यांची जपणूक व्हावी आणि राष्ट्रहिताचे भान निर्माण व्हावे, हा उद्देश होता. मॉक पार्लमेंटमध्ये न्यायाधीश म्हणून विश्वासराव कुलकर्णी आणि दीपमाला काळे यांनी न्यायपूर्ण पद्धतीने भूमिका पार पाडली.

कार्यक्रमात युवकांनी प्रत्यक्ष संसद कार्यप्रणालीसारखी मांडणी करत तात्कालिक परिस्थितीवर अभ्यासपूर्ण चर्चा केली. त्याचबरोबर “आपत्कालीन काळातील घटना व संघर्ष” या विषयावर आधारित माहितीपर प्रदर्शनीचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते पार पडले. तसेच, आणीबाणी काळात शिक्षा भोगलेल्या सत्याग्रही विश्वासराव कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास आमदार सुरेश भोळे, भाजप जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ पलांडे, प्रदेश उपाध्यक्ष अमित सोलंकी तसेच भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धात्मक सत्रात गौरव पाटील याने प्रथम पारितोषिक पटकावले, तर द्वितीय क्रमांक नचल लालवाणी, अनिरुद्ध ठाकूर आणि विशाल पवार यांनी मिळवला. तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार हर्षा ओसानी व दीपक पाटील यांना देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीमध्ये अश्विन सैंदाणे, अक्षय जेजुरकर, स्वप्निल चौधरी, गजानन वंजारी, हर्षल सीतपाल, उन्मेष चौधरी, विकी चौधरी, गौरव पाटील, रोहित सोनवणे, विशाल सोनार आणि भाजप युवा मोर्चा चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी योगदान दिले.

Next Post
शाळेत शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; विद्यार्थीनींना दिसला हृदयद्रावक प्रकार

शाळेत शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; विद्यार्थीनींना दिसला हृदयद्रावक प्रकार

ताज्या बातम्या

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add