• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात पोलिसाशी हुज्जत; कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 23, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात पोलिसाशी हुज्जत; कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील बेंडाळे चौकात वाहतूक शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर लोखंडी कोयता आणि साखळीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी, २१ जून रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी रात्री उशिरा शनीपेठ पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कोळी आणि त्यांचे सहकारी राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ आपल्या कर्तव्यावर असताना ही घटना घडली. शनिवारी सकाळी वाहतूक नियमांची कारवाई सुरू असताना, अल्ताफ अहमद अब्दुल गफूर (वय ६४), मुजम्मिल अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (वय ३०), जुबेर अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (वय ३८, तिघे रा. बालाजी पेठ जळगाव), अरुण रामदास टिलोरे (वय ६७, रा. समता नगर) आणि आदिल बेग शरीफ बेग (वय २७, रा. रामनगर) या पाच आरोपींनी पोलिसांशी वाद घातला.

यावेळी आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ केली. त्यानंतर एका आरोपीने आपल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून (क्रमांक एमएच १९ बीएन ००७८) धारदार लोखंडी कोयता आणि लोखंडी साखळी काढून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर धावून जात धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.

पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कोळी यांनी या घटनेबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, वरील पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करत आहेत.

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
दारूच्या व्यसनाने घेतला मुलाचा बळी: जामनेरमध्ये वडिलांनीच संपवले २५ वर्षीय मुलाला

दारूच्या व्यसनाने घेतला मुलाचा बळी: जामनेरमध्ये वडिलांनीच संपवले २५ वर्षीय मुलाला

ताज्या बातम्या

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

July 9, 2026
जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ
सामाजिक

जळगावात २६ जुलैला वंजारी समाजातर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी व सेवागौरव सत्कार समारंभ

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव जिल्हा

सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

July 8, 2026
१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार
आरोग्य

१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार

July 7, 2026
निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक
जळगाव जिल्हा

निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक

July 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group