• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर दोन जण जखमी

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 15, 2025
in जळगाव जिल्हा
0
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर दोन जण जखमी

जळगाव, (प्रतिनिधी) : कामानिमित्त जळगाव शहरात येत असताना नशिराबाद गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने तरुणांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील एक तरुण ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान रुग्णालयामध्ये तरुणाच्या नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

तेजस सुनील बिऱ्हाडे (वय २१, रा. नशिराबाद ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊ, बहीण यांचेसह गावात राहत होता. तेजसचे वडील मजुरी काम करतात. तर त्याच्यासह त्याचे मित्र तुषार युवराज बिऱ्हाडे (वय १९), अजय अफलातून सपकाळे (वय २२ सर्व रा. नशिराबाद ता. जळगाव) हे खान्देश बँड पथक येथे कामाला आहेत. दरम्यान गुरुवार दि १५ मे रोजी जळगाव येथे बँड पथकाचे काम करण्यासाठी तेजस बिऱ्हाडे, तुषार बिऱ्हाडे आणि अजय सपकाळे हे दुचाकीने नशिराबाद येथून निघाले होते. काही अंतरावर आल्यावर राणे हॉटेल जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने तरुणांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या अपघातामध्ये तेजस बिऱ्हाडे हा जागीच ठार झाला. तर तुषार व अजय या गंभीर जखमी तरुणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद येथील ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली. या ठिकाणी तेजसचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेतील डंपर आणि त्यातील चालक हे नशिराबाद पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी जमा केले आहे. तर नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे नशिराबाद गावावर शोककळा पसरली आहे.

Next Post
रेल्वे मालगाडी रुळावरून घसरल्याने सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

रेल्वे मालगाडी रुळावरून घसरल्याने सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

ताज्या बातम्या

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add