• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बापाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मुलीचा अपघातात मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 14, 2025
in जळगाव जिल्हा
0
बापाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मुलीचा अपघातात मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर, (प्रतिनिधी) : दूध वाटप करून घरी परतत असलेल्या तरुणीच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील लोंढवे शिवारात घडली. घटना दि. १२ रोजी रात्री साडे आठ वाजता अमळनेर धुळे रस्त्यावर लोंढवे फाट्याच्या पुढे घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाग्यश्री दीपक पाटील (वय २२) असे मयत तरुणीचे नाव आहे. जानवे येथील भाग्यश्री दीपक पाटील ही तरुणी वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावण्यासाठी मोटरसायकलला दुधाचे कॅन बांधून एकटी जानव्याहून कधी धुळे तर कधी अमळनेर येत असे. धाडसी कन्या भाग्यश्रीमुळे तिचे वडील दीपक पाटील यांनी व्यवसायात वृद्धी केली होती. दीड महिन्यापूर्वीच मोटरसायकल घसरून तिच्या वडिलांचा अपघात झाला होता. डॉक्टरांनी त्यांना दुचाकी चालवायला बंदी घातली होती. त्यामुळे मुलगी भाग्यश्री हीच दूध ने आण करणे, वाटप करणे हे काम करत होती.

नेहमीप्रमाणे भाग्यश्री १२ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक (एम एच १९, ईबी ६०२७) हिच्यावर दुधाचे कॅन घेऊन अमळनेर येत असताना लोंढवे शिवारात अज्ञात वाहनाने कट मारल्याने मोटरसायकल रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडावर जाऊन आदळली. यात भाग्यश्री खाली पडून डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाली. ग्रामस्थांनी भाग्यश्रीला दवाखान्यात दाखल केले. तेथे मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरुन अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Post
आ. एकनाथराव खडसेंच्या वाहनाला किरकोळ अपघात ; मुक्ताईनगर शहरातील घटना

आ. एकनाथराव खडसेंच्या वाहनाला किरकोळ अपघात ; मुक्ताईनगर शहरातील घटना

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add